उंची वाढत नाहीये? करा हे उपाय; नक्कीच होईल फायदा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

समाजात वावरतांना आपण अनेक व्यक्ती पाहत असतो. यात काही जण उंच असतात, तर काहींची उंची कमी असते. ज्या व्यक्ती उंच असतात अशांना समाजात वावरतांना फारशी अडचण येत नाही. मात्र ज्यांची उंची कमी असते अशांना बऱ्याचदा टीकेला सामोरं जावं लागतं. ठेंगणा, बुटका, छोटा पॅकेट अशा विविध नावाने त्यांची खिल्ली उडविली जाते. परंतु उंची वाढाविण्यासाठी कमी उंचीचे लोक सतत प्रयत्नशील असतात.मात्र त्यांची उंची सरासरीच वाढते. परंतु जर योग्य प्रमाणात उपाय किंवा व्यायाम केला तर उंची नक्कीच वाढू शकते. त्यामुळे जर उंची वाढवायची असेल तर हे उपाय नक्की करुन पाहा..

१. योग्य आहार –

आपल्या शरीराचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये सकस आहाराचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे दररोज सकस आणि पौष्टीक पदार्थांचाच आहार समावेश करायला हवा. आपल्या आहारात व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन यांचं प्रमाण मुबलक हवं. तसंच दूध, फळांचा रस यांचा समावेश करावा. तुम्ही आहार कोणत्या घटकांचा समावेश करता यावर उंची ठरत असते. सकस आहाराचं सेवन केलं तर नक्कीच तुमच्या शरीराचा विकास होईल.

२. योग करणे –

शरीराला फिट आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी योग किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यातच उंची कमी असेल तर नियमित योग केल्यामुळे त्याचे सकारात्मक फायदे पाहायला मिळतील. त्यामुळे योगप्रकारातील ताडासन हे दररोज न चूकता केल्यास उंची नक्कीच वाढेल.

३. योग्य प्रमाणात झोप-

शरीराच्या स्वास्थ्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणं गरजेचं आहे. आपण दिवसभर धावपळ करत असतो. त्यामुळे शरीराला तेवढीच आरामाचीही गरजं असते. त्यामुळे ७-८ तास झोप शरीराला आवश्यक आहे.

४. भरपूर पाणी पिणे –

ऐकायला विचित्र वाटलं तरीदेखील पाणी हे उंची वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतं. आपल्या शरीरात आवश्यक द्रव्यांप्रमाणेच काही विषारी आणि अनावश्यक द्रव्येही असतात. या विषारी द्रव्यांमुळे उंची वाढविण्यात अडथळा येतो. त्यामुळे ही योग्यवेळी शरीरातून बाहेर पडणं गरजेचं असतं. ही विषारी पदार्थ पाण्यावाटे शरीरातून बाहेर पडली जातात. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे. पाण्यामुळे पोटात गॅसही होत नाही.

५. झोपण्याची पद्धत –

बऱ्याच वेळा आपण थकल्यावर कोणत्याही स्थितीमध्ये झोपतो. मात्र झोपताना शरीराची योग्य स्थिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे झोपताना शक्यतो ताठ झोपावं. तसंच चालतांना किंवा फिरतानादेखील सरळ चालावलं. मान वाकवून चालू नये.

Post a Comment

Previous Post Next Post