सौंदर्यप्रसाधनांतील रसायने हानिकारक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कृत्रिम रासायनिक सुगंधी द्रव्ये, सौंदर्यप्रसाधने यासारख्या ग्राहकोपयोगी पदार्थाचा वापर केल्याने त्यांची त्वचेला अॅगलर्जी (वावडे) निर्माण होते. ही अॅ्लर्जी निर्माण होण्याची कारणे आता उलगडली आहेत, त्यातून त्वचेला असणाऱ्या अॅयलर्जीवर उपाय करणे शक्य होणार आहे. सायन्स इम्युनॉलॉजी या नियतकालिकातील शोध निबंधात म्हटल्याप्रमाणे ग्राहकोपयोगी उत्पादनातील रसायनांची अॅालर्जी असू शकते त्यामुळे त्वचेला अपाय होतो. याचे कारण म्हणजे त्वचेच्या पेशीतील मेद रेणू ज्याला लिपिड असे म्हणतात, ते ही रासायनिक उत्पादने त्वचेवर लावल्याने नाहीसे होतात.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत केलेल्या संशोधनानुसार एखादा रासायनिक पदार्थ त्वचेवर लावल्यानंतर त्याची अॅिलर्जी क्रिया ही जेव्हा टी पेशी बाहेरील म्हणजे परक्या रसायनांना ओळखतात तेव्हा सुरू होते पण यात आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे टी पेशी स्वत: बाहेरून आलेल्या रसायनांची ओळख थेटपणे पटवतात असेही नाही. एखादे लोशन, क्रीम त्वचेवर लावल्यानंतर त्यातील मोठी प्रथिने टी पेशींना समजण्याकरिता त्यात काही बदल घडून आलेले असतात.

काही वेळा त्वचेवर लावण्याची सौंदर्य प्रसाधने वापरल्यानंतर त्यातील संयुगे फार लहान असतात, त्यात अॅ.लर्जीस कारण ठरणारी अभिक्रिया करण्यास आवश्यक असलेला रासायनिक समूह नसतो हे लहान रासायनिक घटक खरे तर टी पेशींना समजायला हवेत पण ते समजत नाहीत. तरीही ही रासायनिक द्रव्ये ओळखण्यासाठी त्वचेच्या बाहेरच्या भातील लँगरहान्स पेशींच्या प्रतिकारशक्ती पेशींशी निगडित सीडी १ ए रेणू भरपूर प्रमाणात असतात. त्या रेणूमुळे रसायने टी पेशींना कळतात.

यात अॅ लर्जीस कारण ठरणारी रसायने ही सीडी १ ए रेणूंना चिकटतात. त्यामुळे टी पेशी कार्यान्वित होतात व त्यामुळे बालसम, फारनेसॉल ही व्यक्तिगत वापराच्या उत्पादनातील रसायने त्वचेला समजतात व अॅीलर्जी होते. ही रसायने टूथपेस्ट, त्वचेची क्रीम, सुवासिक द्रव्ये यात वापरलेली असतात. बालसममध्ये असलेली बेन्झिल बेझोएट व बेंझिल सिनॅमेट ही द्रव्ये अॅ्लर्जी निर्माण करतात.

Post a Comment

Previous Post Next Post