मधुमेहींसाठी ‘ही’ फळे ठरतील फायदेशीर!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आजकाल मधुमेह हा आजार अगदी सामान्य झालेला आहे. बदललेली जीवनशैली, अपुरी झोप, ताणतणाव, व्यायामाचा अभाव यासारख्या अनेक बदलांमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे. मधुमेह झाल्यानंतर खाण्यावर अनेक बंधन येतात. त्यातच मधुमेहींमध्ये अनेकदा काय खावं आणि काय खाऊ नये याविषयी समज-गैरसमज निर्माण होत असतात. त्यातच फळांमध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक असतं या कारणामुळे अनेक मधुमेही फळांचं सेवन करण टाळतात. मात्र फळांमध्ये जरी साखरेचं प्रमाण असलं, तरी काही फळं ही अशी आहेत, जी मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतात. चला तर जाणून घेऊयात कोणती आहेत ही फळं –

१. पीच –

पीच या फळामध्ये १.६ ग्रॅम फायबरचं प्रमाण असतं. फायबरमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात आणण्याची क्षमता असते. त्यामुळे पीच हे फळ मधुमेहींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

२. संत्री – गोड, आंबट अशी चव असलेल्या संत्र्यांना मधुमेहींसाठी सुपरफूड मानलं जातं. संत्र्यामध्ये व्हिटॉमिन सी आणि फायबर्स असतात. त्यामुळे ब्लड ग्लुकोजचे प्रमाण कमी होते आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढते.

३. किवी –

किवीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सारखे अॅटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. त्यासोबतच किवीच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. सफरचंद –

मधुमेहींसाठी आवश्यक असणारं फळ म्हणजे सफरचंद. यामध्ये सोल्युब आणि इंसोल्यूब हे दोन्ही फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.

५. पेरु –

पेरुमध्ये ग्यायसेमिक इंडेक्स कमी असून व्हिटॉमिन सी, फायबर्स आणि अॅँटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Post a Comment

Previous Post Next Post