एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी यंदा चैत्यभूमीला पोस्टकार्ड पाठवा मोहिमेचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कौतुक केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना कोरोनामुळे यंदा मुंबईत चैत्यभूमीला येता येणार नसल्यामुळे पोस्टकार्डद्वारे चैत्यभूमीवर पत्र पाठवून अभिवादन करावे असे आवाहन करणारी प्रतीक धनराज कांबळे यांची संकल्पना चांगली असल्याचे कौतुक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळत असून राज्य व देशभरातून आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीला पोस्टकार्ड पत्र पाठवून यंदा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.
यंदा देशभरात कोरोना संसर्गाचा धोका आहे. कोरोना महमारीच्या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करताना गर्दी कुठेही होता कामा नये याची खबरदारी घ्यायची आहे. चैत्यभूमीला दरवर्षी 6 डिसेंम्बरला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो आंबेडकरी अनुयायी येऊन अभिवादन करतात. ती प्रचंड गर्दी यंदा होऊ नये म्हणून सर्वांनीच आवाहन केले आहे. त्यानुसार आंबेडकरी जनता यावर्षी चैत्यभूमीवर येणार नाही. मात्र, आपल्या भावना चैत्यभूमी येथे पोस्टकार्डद्वारे पत्र पाठवून व्यक्त कराव्यात, असे आवाहन केले गेले आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाता येणार नाही असे पहिल्यांदाच होत असून जड अंतःकरणाने आंबेडकरी अनुयायांनी ते स्वीकारले आहे व कोरोनाला हद्दपार केल्यानंतर पुढील वर्षी दुप्पट संख्येने येऊ, असा निर्धार व्यक्त करीत पोस्टकार्डद्वारे यंदा अभिवादन करा, असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment