मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? या सोप्या गोष्टी करुन पाहाच


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज
अनेकदा आपल्या मोबाईल फोनमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येत असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. कॉल, मेसेज पाठवायचे असतात किंवा इंटरनेट वापरायचा असतो, पण नेटवर्क नसल्याने तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या त्रासापासून सुटका करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. काय आहेत या टिप्स जाणून घ्या!

फोनची बॅटरी कायम चार्ज ठेवा

मोबाईल फोन नेटवर्क सर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीची पॉवर खर्ची होते. मोबाईल फोन चार्ज नसेल तर नेटवर्क सर्च करण्यासाठी लागणारी पुरेशी उर्जा उपलब्ध नसते. त्यामुळं मोबाईलची बॅटरी कायम चार्ज करावी. जेणेकरून नेटवर्क सर्च करण्यात अडचण येणार नाही.

सिग्नल बूस्टर

जर नेटवर्क मिळत नसेल तर कंपनीकडे तक्रार करून असे बूस्टर योग्य जागी बसवून घ्यावेत. ग्राहकांनी स्वत:च असे बूस्टर बसवणं बेकायदेशीर आहे हे लक्षात ठेवावं अशी सूचनाही तज्ज्ञांनी केली आहे. बूस्टरमुळे तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळेल.

नेटवर्कमध्ये अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवा

तुमच्या घरात अशा अनेक वस्तू असतात की त्या मोबाईल फोनच्या नेटवर्कमध्ये अडथळा ठरतात. त्यामुळे खोलीत नेटवर्कला अडथळे निर्माण करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक उपकरणे अथवा वस्तू ठेवू नयेत. त्यात खोलीत कमीत -कमी वस्तू ठेवल्यास मोबाईल फोनला नेटवर्क मिळू शकेल.

वाय-फाय वापरा

जर तुम्ही लॅंडलाईन ब्रॉडबॅँड कनेक्शन वापरत असाल तर वाय-फायद्वारे तुम्ही मोबाईल नेटवर्क मिळवू शकता. तसेच अनेक कॉलिंग अॅपचा वापर करून तुम्ही डेटा कॉलही करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post