हेअर मास्क वापरण्यासाठी काही खास टिप्स


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वातावरणातील बदल आणि प्रदुषण याचा परिणाम त्वचेसोबतच थेट आपल्या केसांवरही होत असतो. त्यातच उन्हाळा असल्यामुळे शरीराप्रमाणेच केसांमध्येही घाम येतो आणि केस चिकट होतात. तसंच त्याच्या मळही साचतो. मात्र सध्या लॉकडाउन असल्यामुळे स्पा आणि कॉस्मेटिक क्लिनिक सारं काही बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतेच भर पडली आहे. केसांचे सौदर्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी चांगल्या दर्जेचे शॅम्पू आणि कंडिशनिंगचा वापर करणे गरजेचं आहे. याशिवाय अतिशय महत्त्वाचं म्हणजे, केसांच्या उत्तम पोषणासाठी चेहऱ्याच्या मास्कप्रमाणे केसांचे मास्कचा अवलंब करणे आवश्यक आहे. अनेकदा महिला हेअर मास्क आणि कंडिशनर यात गफलत करतात. मात्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. दोघांचे फायदेही वेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हेअर मास्क वापरण्याचे फायदे.

हेअर मास्क वापरण्याचे फायदे
हेअर मास्क वापरण्याचा नेमका फायदा काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. हेअर मास्कमुळे केसगळती थांबते, तसंच केस तुटत नाहीत, केसांची नीट निगा राखली जाते.तसंच केसात कोंडा होत नाही आणि केस मऊ, चमकदार होतात.

केसांची निगा राखण्यासाठी घरगुती साहित्य?
१. केळी आणि नारळ तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. केळ्यांमध्ये आढळणारे सिलीकामुळे केस मऊ चमकदार होतात. तसंच टाळूतील कोरडेपणा कमी करण्यात मदत मिळते. तर नारळाच्या तेलाचा वापर कंडिशनर म्हणूनही करता येऊ शकतो. त्यामुळे कोमट तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केसांची वाढ होईल. नारळाचे तेल स्काल्पला पोषण देते तसेच कोंड्याची समस्या दूर करते. याशिवाय केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.

२. तेलकट टाळूमुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत दही, सफरचंद आणि कोरफड यांचे मिश्रण करून केसांना लावा. यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते. दहीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

३. केस कमकुवत असल्यास गळण्याची व तुटण्याची समस्य जाणवते. यासाठी अंडी, मध आणि ऑलिव्ह ऑईलचा वापर करणे फायदेशीर आहे. अंड्यातील आतील पिवळ्या बलकात जीवनसत्त्वे ए आणि ई असतात. ज्यामुळे केस मजबूत होण्यात मदत मिळते.

हेअर मास्क कसा वापरावा?
१. केस धुवून ते वाळल्यानंतर हेअर मास्क लावावा किंवा नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल केसांना लावल्यास त्याचाही फायदा होतो.

२. हेअर मास्क लावल्यावर केस जुन्या कापडाने बांधावेत किंवा जुनं कापड केसांना गुंडाळावं.

३. केस लांब असल्यास केसांची क्लिप वापरून आपले केस विभागून घ्या आणि डोक्यातील कोंडा काढण्यासाठी केसांच्या मुळांपर्य़ंत योग्य पद्धतीने तेल लावा.

४. हेअर मास्क शक्यतो ३० मिनीटेच लावून ठेवावा.

५. केसांमध्ये अधिक आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

६. ज्यांचे केस ड्राय आहेत अशांनी आठवड्यातून एकदा हेअर मास्क वापरावा. तर ज्यांचे केस तेलकट आहेत अशांनी दोन आठवड्यातून एकदा वापरावा.

(कोणतेही उपचार, उपाय करण्यापूर्वी डॉक्टर अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post