रक्तदाब नियंत्रणात नाही? मग आहारात करा गवारीचा समावेश

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सगळ्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे असं आपण वारंवार ऐकतो. मात्र, तरीदेखील काही भाज्या या अशा असतात ज्या शरीरासाठी कितीही चांगल्या असल्या, तरीदेखील त्या खाण्याची इच्छा होत नाही. यात साधारणपणे गवार, वांगी, फरसबी, कारली या भाज्यांचा हमखास समावेश होतो. मात्र,या भाज्या शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहेत. त्यामुळेच गवार खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

गवार खाण्याचे फायदे

१. मधुमेहींसाठी गवार अत्यंत फायदेशीर आहे.

२. हाडे मजबूत होतात.

३.हदयाशीनिगडीत समस्या, तक्रारी दूर होतात.

४. त्वचेसंबंधीत समस्या असल्यास दूर होतात.

५. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

६. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post