पोटाच्या तक्रारीवर 'हा' आहे रामबाण उपाय!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की अनेक जण सुंठ घातलेला चहा पितात. तसंच बऱ्याच वेळा खोकला झाल्यावरदेखील सुंठ पावडर खाल्ली जाते. चवीला तीक्ष्ण असलेली सुंठ पावडर खाण्यासाठी अनेक जण नाक मुरडतात. मात्र, ही पावडर शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. केवळ सर्दी-खोकलाच नाही तर अन्य किरकोळ समस्यांवरदेखील सुंठ पावडर फायदेशीर ठरते. त्यामुळे सुंठ पावडरचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

सुंठ पावडर खाण्याचे फायदे

१. पचनक्रिया सुधारते.

२. अपचन, बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे या समस्या दूर होतात.

३.खोकला, सर्दी, ताप या तक्रारींमध्ये गुणकारी.

४. डोकं दुखत असल्यास सुंठ पावडरचा लेप डोक्यावर लावावा.

५. मासिक पाळीत त्रास कमी होतो.

६. वजन नियंत्रणात राहते.

७.शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

८.रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

९. कोलेस्ट्रॉल कमी होते.

सुंठ पावडर कशी तयार कराल?

आलं उन्हामध्ये चांगलं कडक वाळवून घ्या. त्यानंतर हे वाळलेलं आलं मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पूड करुन घ्या. तयार पूड गाळणीच्या सहाय्याने चाळा. अशा प्रकारे घरच्या घरी सुंठ पावडर तयार करता येऊ शकते.

(कोणतेही उपचार सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post