झोप पूर्ण होत नाही? मग आहारात करा तमालपत्राचा समावेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सगळ्या मसाल्यांमध्ये मानाचा पदार्थ म्हणजे तमालपत्र. कोणताही मसाला तयार करायचा असेल तर त्यात तमालपत्र हे आवर्जुन घातलं जातं. त्याचप्रमाणे मसालेभात किंवा एखादा मसालेदार पदार्थ असेल तर त्यात तमालपत्र घातलं जातं. पदार्थांची चव वाढवणारा हा पदार्थ शरीरासाठीदेखील तितकाच गुणकारी आणि फायदेशीर आहे. परंतु, त्याचे फायदे फार कमी जणांना माहित आहेत. त्यामुळेच तमालपत्राचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. तमालपत्राचं सेवन केल्यामुळे अपचन दूर होतं.

२. कफ, अॅसिडिटी, पित्ताचा त्रास असल्यास कमी होतो.

३. तमालपत्रामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी तमालपत्र फायदेशीर आहे.

४. शांत झोप लागते.

५. किडनी स्टोनचा त्रास कमी होतो.

६. किडनीशीनिगडीत समस्या असल्यास दूर होतात.

७. डोकेदुखी, मानदुखी असल्यास तमालपत्राच्या तेलाने मालिश करावी. आराम मिळतो.

Post a Comment

Previous Post Next Post