..म्हणून हिवाळ्यामध्ये मध खाणे जास्त फायद्याचे ठरते!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सर्वात उत्तम नैसर्गिक औषध म्हणजे मध! मधाचे महत्व अगदी आयुर्वेदातही नमूद करण्यात आले आहे. कोणताही ऋतू असला तरी रोज केवळ दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि स्वस्थ राहते. मात्र थंडीमध्ये मध खाण्याचे विशेष फायदे आहेत.

मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा सर्व महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारांचे मिश्रण असते. या सर्वांमध्ये एकत्रितपणे ७५ टक्के साखर असते. मधाला गुणाकरी का म्हणतात याचा अंदाज यावरून येईल की मधामध्ये एन्जाइम, अमीनो एसिड, प्रोटीन, एल्ब्युमिन, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी गुणकारी तत्व असतात. मधाच्या सेवनाबद्दलची आणखी माहिती जाणून घेऊयात.

 • मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत
 • हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.
 • त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.
 • खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.
 • ज्यांना डोळ्यांशी संबंधीत आजार असेल त्यांनी गाजर आणि मधाचे एकत्रित सेवन करणे फायद्याचे ठरते. दोन लहान चमचे मध गाजराच्या रसामध्ये घालून प्यावे. मधाबरोबर घेतलेला हा गजराचा सर निरोगी दृष्टीसाठी फायद्याचा असतो. डोळ्यांत सतत पाणी येण्याचा त्रास असणाऱ्यांनाही मध घालून गाजराचा रस पिणे फायद्याचे ठरते.
 • वर नमूद केल्याप्रमाणे आयुर्वेदामध्येही मधाचे महत्व सांगितले आहे. आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी मधाचे सेवन केल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. एक चमचा लसणाचा रस आणि दोन लहान चमचा मधाच्या मिश्रणाचे नियमितपणे सेवन केल्यास राक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.
 • रक्तशुद्धीसाठी मध उपयुक्त असतो. त्यामुळेच अनेकदा नियमीत मधाचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
 • जे नियमितपणे मधाचे सेवन करतात त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता खूप कमी असते.
 • थंडीतला ठरलेला आजर म्हणजे सर्दी, पडसे किंवा छातीत कफ होणे. या तिन्ही तक्रारींवर एकमेक उपाय म्हणजे चहामध्ये किंवा कोमट पाण्यात एक ते दोन चमचे मध टाकून प्यावे. याचा बराच फरक पडतो.
 • मधाच्या सेवनाने शरिरास मुबलक प्रमाणात अ, ब आणि क जीवनसत्व मिळतात.
 • मधाच्या सेवनाने शरिराला आर्यन, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस आणि आयोडीन यासारख्या महत्वाच्या घटकांचाही योग्य प्रमाणात पुरवठा होतो. ज्यामुळे शरीर ताकदवान होते.
 • मध, आले आणि काळी मिरी पावडरच्या सम प्रमाणातील मिश्रण करुन ते नियमित प्यायल्यास दम्याच्या आजार निश्चितपणे कमी होतो.
 • पोट दुखत असेल, मळमळत असेल तर आल्याच्या किंवा लिंबाच्या रसात मध मिसळून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.
 • केसांच्या आरोग्यासाठीही मध फायद्याचे ठरते. दररोज दोन चमचे मध खालल्यास केसांची चांगली वाढ होते.
 • त्याचबरोबर केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठीही मधाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
 • थंड पाण्यामध्ये मध मिसळून दररोज प्यायल्यास त्वचा तजेलदार राहते.

Post a Comment

Previous Post Next Post