डोकेदुखीने त्रस्त आहात? मग करा गवती चहाचं सेवन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पावसाळा सुरु झाला की सर्दी,खोकला असे आजार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा गृहिणी गवती चहा करतात. पण पावसाळा संपला कि गवती चहा करण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र, दररोज गवती चहा प्यायल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला होऊ शकतात. त्यामुळेच गवती चहा पिण्याचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

गवती चहा पिण्याचे फायदे..

१. गवती चहाच्या सेवनामुळे पोटदुखी व पोटासंबंधीत विकार दूर होतात.

२. डोकेदुखी थांबते.

३. सर्दी, पडसं झाल्यास गवती चहाच्या काढ्याचा वाफारा घ्या.

४. सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा. तसंच त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.

५. शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.

६.गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.

दरम्यान, गवती चहाला सुगंध भूतृण (संस्कृत), अग्याघास, गंधबेना (हिंदी), हरिचांय (सिंधी), गंधतृण (बंगाली), लेमनग्रास (इंग्रजी) अशा विविध नावाने संबोधलं जातं. तर त्याच्या अर्कास‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल’ असेही म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post