केसांमध्ये सतत कोंडा होतो? मग लिंबाच्या वापरामुळे करा ही समस्या दूर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

उन्हाळा सुरु झाला की प्रत्येकाला लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत पिण्याची इच्छा निर्माण होते. तर अनेक गृहिणीदेखील लिंबाचं लोणचं वगैरे करण्याची लगबग सुरु करतात. परंतु, लिंबाचा वापर केवळ सरबत किंवा लोणच्या पुरता मर्यादित नसून त्याचा अन्य दुसऱ्या पद्धतीनेदेखील वापर करता येऊ शकतो. त्यामुळे लिंबाचे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

लिंबाचे फायदे

१. दातातून रक्त येत असल्यास लिंबाच्या रसात साखर घालून त्याचं सेवन करावं.

२. पोटात जळजळ होत असल्यास कमी होते.

३. शरीरावर सतत खाज येत असल्यास कमी होते. त्यासाठी दोन चमचे खोबरेल तेलामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून सर्वागाला चोळून मग गरम पाण्याने आंघोळ करावी.

४. लघवी साफ होते.

५. केसांची चमक वाढते.

६. केसगळत असल्यास किंवा डोक्यात कोंडा असल्यास दोन चमचे खोबरेल तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन कापराच्या वडय़ांची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी चोळून लावावे. दोन तासांनी केस धुवावे.

७. वजन कमी होते.

८. अपचन झाल्यास लिंबूपाणी प्यावे.

९. आजारपणात तोंडाची चव गेल्या लिंबाचं लोणचं खावं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 
'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post