हृदयाबरोबरच आतड्यासाठी अक्रोड लाभदायक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अक्रोडच्या सेवनाने आतड्याबरोबरच हृदयविकाराचे आरोग्यही सुधारते, असा दावा पेनसिल्वानिया स्टेट विद्यापीठाच्या एका संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार अक्रोडामध्ये प्रथिने, मेद, कॅल्शियम व लोह असते. त्यामुळे शेंगदाण्यासारखे अक्रोडही सेवन केले, तर त्याचा फायदा जास्त चांगल्याप्रकारे होतो.

अक्रोड सेवनाने रक्तदाब नियंत्रित होत असल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते. अक्रोडमध्ये अल्फा लिनोलिक आम्ल असते. तो ओमेगा ३ मेदाम्लाचा प्रकार आहे. क्रिस्तिना पीटर्सन व प्रा. पेनी ख्रिस एथर्टन यांनी हे संशोधन केले असून त्यात अक्रोडचे आरोग्यास असलेले फायदे दाखवून देण्यात आले आहेत.

अक्रोड सेवनाने आतड्यात विशिष्ट प्रकारचे जीवाणू तयार होऊन त्याचा लाभ हृदयविकारास अटकाव करण्यासाठी होतो, असा दावा ख्रिस एथर्टन यांनी केला आहे. ३०-७५ वयोगटातील जास्त वजनाच्या व लट्ठ व्यक्तींवर याबाबत प्रयोग करण्यात आले. अक्रोड सहा आठवडे सेवन करणाऱ्या गटात चांगले परिणाम दिसून आले. या लोकांमध्ये आतडय़ातील उपकारक जीवाणूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यात रोझबुरिया नावाचे जीवाणू तयार होतात. ते आतडय़ाचे अस्तर बळकट करणारे असतात. इ इलिगन्स हे जीवाणू रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदयविकारास अटकाव होतो. लॅक्नोस्पिरासी हे जीवाणू रक्तदाब, कोलेस्टेरॉल कमी करतात. अक्रोडमध्ये चोथा, मेदाम्ले व इथर घटक मोठ्या प्रमाणात असतात.

Post a Comment

Previous Post Next Post