पालक खाण्याचे ‘हे’ फायदे ऐकाल, तर आजपासून आहारात कराल समावेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लहान मुलांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये लोह, प्रथिने, कॅल्शिअम या घटकांचा समावेश करणं गरजेचं असतं. हे पदार्थ पालेभाज्या, कडधान्य या सारख्या पदार्थांमधून मिळत असतात. मात्र आजकालच्या लहान मुलांना पालेभाज्याचं वावडं असल्याचं पाहायला मिळतं. परंतु पालेभाजीचं आपल्या आहारामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. शरीराच्या वाढीसाठी, डोळ्यांचा आरोग्यासाठी पालेभाज्या अत्यंत उपयुक्त आहेत. या पालेभाज्यांमध्ये आवर्जुन खावी अशी भाजी म्हणजे पालक. पालक केवळ एक भाजीच नाही तर तिचे औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे –

१. आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात.

२. पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो.

३. पालकामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.

४. अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.

५. पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

६. अंगावर गाठ येऊन जर सूज आली असेल तर अशा वेळी पालकाच्या पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.

७. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

८. आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post