डायबिटीज असणाऱ्यांनी ‘ही’ फळे खाणे टाळावे!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आजारपणामध्ये औषधांसोबतच योग्य आहार आणि डाएट करण्याची तितकीच गरज असते. आजारपणामध्ये योग्य आहार घेतला तरच आजारपण दूर होऊ शकतो. तसंच औषधांचा योग्य परिणामही होतो. मधुमेह असलेली व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांना प्रथम त्यांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पथ्य पाळताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच मुधमेही व्यक्तींनी पथ्य पाळत असताना काही फळांचं सेवन हे कटाक्षाने टाळायचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेहींनी सेवन न करणारी काही फळे –

१. केळी –

केळी हे एक एनर्जी फ्रुट आहे. केळींमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर रुग्णांना केळी खाण्यचा सल्ला दिला जातो. मात्र हे फळ मधुमेहींसाठी योग्य नाही. यात साखरेच प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेहींनी या फळाचे सेवन न केल्याचंच बरं.

२. आंबा –

आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण प्रचंड असतं. एका आंब्यामध्ये जवळपास ४५ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. त्यामुळे मधुमेहींनी कधीही आंब्याचं सेवन करु नये. तसंच जर खाण्याची इच्छा झाली तर त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. चेरी –

सर्वाधिक लोकप्रिय फळ म्हणजे चेरी. लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना आवडणाऱ्या या फळामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साखर असते. एक कप चेरीमध्ये १८ ग्रॅम शुगर असते. मधुमेही व्यक्तींनी जर चेरी खाल्ली तर त्यांच्यासाठी ती धोकादायक आहे.

४. द्राक्ष –

एक कप द्राक्ष खाल्ल्यानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण २३ ग्रॅमने वाढलं जातं. त्यामुळे जर मधुमेही व्यक्तींना द्राक्ष खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी मर्यादित सेवन करावं.

५. लीची –

सर्वाधिक जास्त नैसर्गिक असलेल्या फळांमध्ये लीची या फळाचा समावेश होतो. एक कप लीचीमध्ये २९ ग्रॅम नैसर्गिक साखर असते जी रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी या फळाचं सेवन कटाक्षाने टाळावं.

Post a Comment

Previous Post Next Post