कानदुखीने त्रस्त आहात? मग जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सततची धावपळ, दगदग यामुळे अनेकदा शारीरिक थकवा येतो. अंगदुखी, पाठदुखी अशा समस्या निर्माण होतात. त्यासोबतच ऋतू बदलला की सर्दी, खोकला अशे किरकोळ आजारदेखील डोकं वर काढतात. यामध्येच अनेकदा थंडीमुळे किंवा जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काहींना कानदुखीची समस्या निर्माण होते. त्यामुळे कानदुखीवर घरगुती उपाय कोणते करता येऊ शकतात ते जाणून घेऊया.

१. तेल – मोहरीचं तेल किंचित गरम करुन त्याचे काही थेंब कानात टाकावेत. मोहरीच्या तेलाऐवजी बदामाचं तेल वापरणंदेखील फायद्याचं ठरु शकतं.

२. कांदा – कान ठणकत असेल तर कांद्याचा रस काढून तो थोडासा गरम करावा व त्याचे १- २ थेंब कानात घालावेत.

३. सुती रुमालाने कान शेकून काढावा.

४. कानात कापूस घालावा.

५. हलक्या हाताने कान व मानेजवळ मसाज करावा.

६. पिन, उदबत्तीची काडी अशा गोष्टींनी कान कोरु नये.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post