‘हे’ चार घरगुती उपाय करुन खुलवा ओठांचं सौंदर्य!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग त्या महिला असू देत किंवा पुरुष. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण शक्य होईल तसे प्रयत्न करत असतात. त्यातच मग विविध प्रसाधनांचा वापर हा ओघाओघाने आलाच. सुंदर दिसण्याच्या शर्यतीमध्ये महिलावर्ग मात्र कायम अग्रेसर असतो. वेगवेगळे ब्युटी प्रोडक्स त्या ट्राय करत असतात. मात्र या प्रसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक वेळा त्वचेला हानी पोहोचते. परिणामी चेहऱ्यावर डाग, पिंपल्स येतात. इतकंच नाही तर अनेक वेळा वेगवेगळ्या शेडच्या किंवा ब्रँण्डच्या लिप्स्टिक ट्राय केल्यामुळे ओठांनाही काळपट येतो. ओठांचा हा काळपटपणा अनेक वेळा सौंदर्यामध्ये बाधा ठरतो. त्यामुळे मग महिलांकडून सुरु होतात ते ओठ गुलाबी करण्याचे ना ना विविध प्रकार. परंतु अनेक उपाय करुनही हा काळपटपणा दूर होत नाही. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यामुळे ओठांचा गुलाबीपणा पुन्हा आणण्यास मदत होऊ शकते. चला तर मग पाहूयात ओठांचा काळपटपणा दूर करण्याचे काही घरगुती उपाय :

१. लिंबाचा रस –

सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणार साधनांमध्ये मेलानिनचं प्रमाण अधिक असतं. या मेलानिनमुळे ओठांना काळपटपणा येतो. हा काळपटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस हा सर्वोत्तम मार्ग आहे. लिंबाच्या रसामध्ये सॅट्रीक अॅसिडचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. सॅट्रीक अॅसिड मेलानिनचं प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी एका लिंबाचा रस काढून तो ओठांवर लावावा. त्यासोबतच लिंबाचं सालाने ओठांवर हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ओठ गार पाण्याने धुवावेत. हा प्रयोग महिनाभर तरी करावा.

२. बीटाचा रस –

ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग आणण्यासाठी बीटाचा रस हा अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी एक चमचा बीटाचा रस घेऊन त्यामध्ये एक चमचा दुधावरची साय (मलई) मिक्स करावी. हा लेप ओठांवर लावून १० मिनीटे मसाज करावा. त्यानंतर गार पाण्याने ओठ धुवावेत.

३. कोरफडीचा रस –

चवीला कडवट असणारी कोरफड ही बहुगुणी आहे. त्वचेचा पोत सुधारण्यासोबतच कोरफडीमुळे ओठांचा काळेपणाही दूर होतो. त्यामुळेच कोरडीचा रस घेऊन तो ओठांवर लावावा. त्यानंतर कोमट पाण्याने ओठ स्वच्छ धुवावेत. यामुळे ओठांचा काळपटपणा दूर होण्यासोबतच ओठ मुलायमही होतात.

४. हळद-

हळदीमुळे त्वचेचा रंगही उजळतो. त्यामुळे ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी हळद उपयोगी ठरते. अर्धा चमचा दूधामध्ये हळद मिक्स करुन त्याचा लेप तयार करावा. हा लेप १० मिनीटे ओठांवर लावावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवावेत. हा लेप धुतल्यानंतर ओठांवर मॉच्यराइजरदेखील लावावे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post