काय सांगता.. केळीपासून हेअर पॅक, जाणून घ्या कसा कराल तयार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्त्रियांचं खरं सौंदर्य त्यांच्या केसात दडलेलं असतं असं म्हणतात. अनेक जणींना लांब, काळेभोर केस आवडतात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अशा लांबसडक केसांची काळजी घेणं शक्य होत नाही. केसांची काळजी घेणे हे लहानपणी आई करते आणि नंतर मोठेपणी अनेक कारणांनी त्याकडे दुर्लक्ष होते आणि मग अचानक कधीतरी जाणवते. केस गळत आहेत, पिकताहेत, रुक्ष झालेत इत्यादी. मग त्यानंतर घणदाट, मुलायम आणि निरोगी केसासाठी घरगुती उपाय करण्याकडे अनेकांचा कल असतो. आज आपण घणदाट केसांसाठी केळीचा उपाय कसा करतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

केळी हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. केळ्याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘मुसा पॅराडिसिअ‍ॅका’ म्हटले जाते. केळीपासून तयार केलेले हेअर मास्क तुम्हाला घणदाट आणि निरोगी केस तसेच केसांची गळती, कोंडा थांबवू शकते. जाणून घेऊयात केळीपासून हेअर मास्क कसा तयार करतात.

सामग्री

– केळी

– एक चमचा मध

– एक चमचा केसाला लावायचे तेल

– एक चमचा दही.

असा तयार कराल हेअर मास्क

– केळीची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्या.

– या पेस्टमध्ये मथ, तेल आणि दही टाकून पुन्हा मिक्सरमध्ये एकत्र करा.

– त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा अन् चांगली मालीश करा.

– एक ते दोन तास ही पेस्ट केसावरच राहू द्या.

– तुमच्या नियमीत शाम्पूने केसांना चांगले धुवून घ्या आणि कंडीशनर लावा.

कंडीशनर लावल्यानंतर कंगव्याने केसांना हळू हळू विंचरा.. जेणेकरून केसांमधील केळीचा तुकडा किंवा हेअरपॅक राहणार नाही. त्यानंतर थोडावेळ थांबा आणि पुन्हा कंगव्याने केस विंचरा..

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post