तजेलदार त्वचेसाठी मूग डाळीचा या पाच प्रकारे करा वापर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सुंदर त्वचा हे चेहर्‍याचे मुख्य आकर्षण आहे. त्वचा आकर्षक आणि नितळ दिसण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सुंदर आणि नितळ त्वचेसाठी बाजारातील उत्पादने न वापरता घरच्या घरी देखील चेहरा नितळ आणि आकर्षक बनण्यास मदत होते. मूग डाळ त्वचेवर नितळ सौंदर्यासाठी कमालीची फायदेशीर होऊ शकते. स्वास्थसाठी मूग दाळ फायदेमंद आहेच त्याशिवाय तुमच्या त्वचेसाठीही मूग दाळ तेवढीच फायदेशीर आहे. मूग डाळ आपल्या स्किन केयर रुटीन (Skin Care Routine) मध्ये सामाविष्ठ करण्यासाठी मूग दाळीचा पेसपॅक किंवा फेसस्क्रब तयार करु शकता.

१) डेड स्कीन कमी करण्यासाठी

चेहऱ्यावरील डेड स्किन आपली त्वचा खरबडीत करू शकते. मूग डाळीमुळे अशाप्रकारची डेड स्कीन नाहीशी होई शकते. मूग डाळीमुळे त्वचा आतून आणि बाहेरूनही मोइस्टराइज़ होते. त्यामुळे त्वचेवरील डेड स्कीन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

२) मूग डाळ फेसपॅक

मूग डाळीचा फेसपॅक कोरडी आणि खरबरीत त्वचावर आधिक प्रभावी ठरू शकते. त्यासाठी मूठभर मूगडाळ रात्रभर दुधात भिजवा. सकाळी मिक्सरमधून त्याची लहान पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिट चेहऱ्यावर लावा. वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळा करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला त्वचेमध्ये बदल दिसून येईल.

३) पिंपल्ससाठी काय कराल

मूठभर मूगदाळ पाण्यामध्ये रात्रभर भिजू घाला. सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये चमचाभर तूप टाकून चांगले मिश्रण तयार करा. त्यानंतर ही पेस्ट १० ते १५ मिनिट चेहऱ्यावर लावा. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

४) उन्हाळ्यात टॅन होणारी त्वचा नितळ करण्यासाठी

उन्हामुळे अनेकांची त्वचा टॅन होते. मूग डाळीने ही टॅन त्वचा तुम्ही घालवू शकता. त्यासाठी मूठभर मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजू घाला. सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या. यामध्ये थोड्याप्रमाणात दही आणि कोरफड मिसळा. तयार होणाऱ्या पेस्टला चेहऱ्यावरील किंवा हातावरील टॅन झालेल्या जागेवर लावा. पाच ते दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने त्वचा धूवून घ्या.

५) तजेलदार त्वचेसाठी

मूग दाळ त्वचाला मोइस्टराइज करू शकते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होते. एक छोटा चमचा मूग डाळ आवडत्या लोशनमध्ये मिसळा आणि स्कीनवर लावा. आठवड्यातून तीनवेळा हा प्रयोग करा. तुम्हाला त्वचेमध्ये फरक जाणवेल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post