फ्रीजमधील कणकेच्या पोळ्या खाताय? मग हे वाचाच!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. कोणतंही क्षेत्रं असो आजची स्त्री पुरुषांच्या मागे नाही. परंतु स्त्री कितीही प्रगत झाली किंवा तिने करिअरमध्ये कितीही उंची गाठली तरीदेखील तिच्या मागची घरची जबाबदारी काही केल्या संपत नाही. तिला करिअरसोबतच घरही सांभाळायचं असतं. ऑफिसमधलं टार्गेट पूर्ण करणं आणि घरातली इतर सगळी कामं करणं यामध्ये स्त्रिया अत्यंत गुंतून गेल्या असतात. या साऱ्या धावपळीमध्ये तिला बऱ्याच वेळा स्वत:साठीदेखील वेळ देता येत नाही. मात्र ती तिच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडत असते. विशेष म्हणजे अनेक स्त्रिया सकाळच्या वेळात घाईघाईत घरातलं सगळं आवरुन ऑफिसला जातात. या धावपळीमध्ये थोडं काम हलकं व्हावं यासाठी स्त्रिया सकाळी डबा करताना लागणारी भाजी रात्रीच निवडून किंवा चिरुन ठेवतात. तसंच बऱ्याचदा पोळ्यांसाठी लागणारी कणिकदेखील रात्रीच भिजवून फ्रीजमध्ये ठेवतात. कणिक आदल्या दिवशी भिजवल्यामुळे काम हलकं होतं. मात्र फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक शरीरासाठी घातक असते.

१. फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेली कणिक दुसऱ्या दिवशी थोडीशी काळसर रंगाची दिसायला लागते. त्यामुळे शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो.

२. फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या किंवा पराठे कडक होतात. त्यामुळे अशा पोळ्या खाल्ल्याने पोट दुखतं. त्यामुळे शक्यतो अशा पोळ्या खाणं टाळा.

३. भिजवलेलं पीठ बराच वेळ तसं ठेवल्यामुळे त्यात अंबविण्याची प्रक्रिया सुरु झाली असते. भिजवलेल्या पीठामध्ये काही बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब होतात.

४. तसंच शिळं अन्न खाऊ नये असं म्हटलं जातं. शिळं अन्न खाल्यामुळे ना-ना प्रकारचे आजार होऊ शकतात. तसंच त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

Post a Comment

Previous Post Next Post