रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रक्त हा शरीरातील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे रक्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले तर रक्ताची कमतरता निर्माण होते. इतकंच नाही तर रक्ताचं प्रमाण कमी झालं तर अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. यामध्ये मग अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो अथवा थकवाही जाणवतो. त्यामुळे शरीरात रक्त योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे असे घरात उपलब्ध होतील असे काही पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी नैसर्गिकरित्या रक्ताचे प्रमाण वाढवण्ययाच्या टीप्स..

१. सोयाबीन-

सोयाबीनमध्ये व्हिटामिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.

२. सैंधव मीठ –

सेंधव मीठाचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी सैंधव मीठ अत्यंत उपयुक्त आहे. सैंधव मीठ आणि थोडीशी मीरपूड एकत्र करुन ही पूड डाळींबाच्या ज्युसमध्ये मिक्स करावी आणि दररोज हा ज्युस प्यावा. हे ज्युस दररोज प्यायलामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

३. गुळ आणि शेंगदाणे-

गुळा सोबत शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील आयरन वाढते. त्यामुळे अनेक वेळा लहान मुलांना शेंगदाण्याचा लाडू दिला जातो.

४. पालक –

पालकामध्ये व्हिटामिन ए, सी, बी ९, आयर्न, फाइबर आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एकावेळीच वीस टक्क्यांपर्यंत आर्यन वाढवू शकते. पालक तुम्ही भाजी अथवा सूप करून करू शकतात.

५. टोमॅटो –

टोमॅटोमध्ये रक्त वाढविण्याचे गुणधर्म अधिक असतात. रक्ताची कमतरता जाणवत असल्याचं एक ग्लास टोमॅटोचा रस प्यावा.

६. बीट –

बीटामध्येदेखील रक्त वाढविण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे रोज किमान एक ग्लास तरी बीटाचा रस प्यावा. बीटचा रस पिण्यामुळे शरीराला आयरन अधिक प्रमाणात मिळते ज्यामुळे रक्त तयार होते.

Post a Comment

Previous Post Next Post