इंटरनेटचा मिळणार आता अधिक वेग.. 'एक्स्ट्रीम'ने केली पायाभूत सुविधांमध्ये वाढ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोविड-१९ आजार साथीमुळे लक्षावधी लोक घरीच राहून काम करीत असल्याने इंटरनेट वापराची मागणी वाढली आहे. त्यामुळे इंटरनेट गतिमानता आणि बँडविड्थ क्षमतेत वाढ होण्याची गरज लक्षात घेऊन एक्स्ट्रीम आयएक्सने पायाभूत सुविधा विकासावर भर दिला असून, एक्स्ट्रीम आयएक्स आता देशभरात २० ठिकाणी अस्तित्व विस्तारू शकले आहे. मुंबईतील नव्या पायाभूत सुविधांची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.

भारतीय इंटरनेट सेवा प्रदाते तसेच स्थानिक व आंतरराष्ट्रीय कंटेट प्रदाते यांना वाहक तटस्थ, डेटा सेंटर तटस्थ सेवा देण्य़ाचे काम एक्स्ट्रीम आयएक्स करते. इंटरनेट एक्स्चेंज पॉइंट (आयएक्स) हे असे भौतिक ठिकाण असते, ज्या माध्यमातून इंटरनेट सेवा प्रदाते (आयएसपी), कंटेन्ट प्रदाते (सीडीएन) आणि एंटरप्राइजेस यासारख्या इंटरनेट पायाभूत कंपन्या परस्परांशी संधान साधतात. आयएक्स देशातील फिक्स्ड ब्रॉडबँडच्या विकासाला हातभार लावते आणि ब्रॉडबँड इंटरनेटवर अधिकाधिक वापरकर्ते मिळविण्यास, खर्च कमी करण्यात आणि प्रदात्यांसाठी अधिक पैसे कमविण्यास तसेच अंतिम वापरकर्त्यांना एकाच घरात मल्टिपल स्क्रीन्सद्वारे सेवा देण्यास मदत करते. ब्राँडबँड व्यवसायात सखोल तज्ज्ञता एक्स्ट्रीम ग्रुपकडे आहे. एक्स्ट्रीम आयएक्स हे आयएसपींच्या बँडविड्थ खर्चात लक्षणीय कपात करण्यासह त्यांना त्यांच्या ग्राहकांना अतिशय वेगाने कंटेट वितरणाची सेवा देणारी सक्षमता प्रदान करीत आहे. भारतातील सर्वात मोठा आयएक्स चालवण्याव्यतिरिक्त आयएसपींचा केवळ संक्रमण काळ (आयएलएल) वाचविणे इतकेच नाही तर लॅनच्या क्षमतांचा देखील पुरेपूर वापर करण्यात मदत करण्यासाठी एक्स्ट्रीम हे अत्याधुनिक कॅशिंग आणि कंटेंट एक्सीलरेशन सोल्यूशन प्रदान करते आहे. एक्स्ट्रीमने केबल आयएसपींच्या ग्राहकांना हाय-स्पीड डाउनलोडच्या सेवेसह भारतात अल्ट्रा-फास्ट इंटरनेटही आणले आहे. एक्स्ट्रीम ग्रुपचे कार्यकारी संचालक रौनक माहेश्वरी म्हणाले, आयएसपी व्यवसायाच्या सर्व पैलूंची एक्स्ट्रीमला सखोल माहिती आहे. आमच्या सेवा या आयएसपी आणि अंतिम वापरकर्ते यांची अनुभूती वृद्धींगत करण्यासह इंटरनेट सेवा किफायतशीर राहील याकडे लक्ष देणारी आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या विकास केंद्रांच्या ठिकाणी सेवेसाठी सज्ज असणे हे आमचे मिशन आहे. आमची वाढती उपस्थिती उत्तरोत्तर देशातील पीअरिंग इकोसिस्टम सुधारत नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post