देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची काय गरज?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राजधानी दिल्लीत नवे संसद भवन उभे राहणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. यावरून प्रसिद्ध अभिनेते व मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘देशातील अर्धी अधिक जनता उपाशी झोपत असताना एक हजार कोटींच्या नव्या संसद भवनाची गरज काय?’ असा सवाल कमल हसन यांनी केला आहे.

तामिळनाडूत 2021 ला विधानसभा निवडणूका होणार आहेत. कमल हसन यांनी आजपासून त्यांच्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी नव्या संसद भवनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच फटकारले.

‘अर्धा देश उपाशी झोपतोय. अशा परिस्थितीत 1000 कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोरोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावले आहे. चीनची भिंत बांधताना हजारो लोकं मेली त्यावेळी देशातील नेत्यांनी सांगितले की ही भिंत देशाच्या संरक्षणासाठी आहे. तुम्ही कोणाच्या संरक्षणासाठी हे 1000 कोटींची इमारत बांधत आहात. आदरणीय पंतप्रधान कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’, अशा शब्दात कमल हसन यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

64 हजार चौरस फूटात बनणार नवे संसद भवन

केंद्र सरकारचे प्रस्तावित नवे संसद भवन हे 64,500 चौरस मीटर जागेवर बांधण्यात येणार आहे. नुकताच या संसद भवनाचा भूमी पूजन सोहळा पार पडला. नव्या भवनात लोकसभा खासदारांसाठी 888 आणि राज्यसभेच्या खासदारांसाठी 326 आसने असतील. सभागृहात एकाच वेळी 1224 सदस्य बसू शकतील. हे संसद भवनाची निविदा टाटा कंपनीला मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post