‘केटो’ आहार करतो डायबिटीजचा धोका कमी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केटोजेनिक आहारातून मेद व प्रथिनातून ९९ टक्के उष्मांक मिळत असतात. त्यात अल्पकालीन पातळीवर काही आरोग्यविषयक फायदे दिसत असले, तरी नंतर एक आठवड्याने त्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागतात, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

नेचर मेटॅबोलिझम या नियतकालिकात म्हटले आहे की, केटो आहार हा मर्यादित काळासाठी लाभ मिळवून देतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. ग्वानेथ पाल्ट्रो व किम करदाशियन यांच्यासह अनेक वलयांकित व्यक्ती हा केटो आहार घेतात. त्यामुळे ही आहार पद्धती लोकप्रिय मानली जाते. यातील आहाराने शरीर मेद पटापट जाळू लागते. त्यामुळे काही प्रमाणात फायदा होतो, असे अमेरिकेतील येल विद्यापीठाचे प्राध्यापक विश्वदीप दीक्षित सांगतात.

जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी केटो आहारातील कर्बोदकांच्या कमी प्रमाणामुळे घटते, तेव्हा शरीर उपासमारीच्या अवस्थेत जाते असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात या काळात शरीर कर्बोदकांऐवजी मेद जाळण्यास सुरुवात करते. यातून शरीरासाठी पर्यायी इंधन असलेली केटोन रसायने तयार होतात. जेव्हा शरीर केटोन जाळू लागते तेव्हा शरीरात गॅमा डेल्टा टी पेशी विस्तारतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे शरीराची चयापचयाची क्रिया सुधारते.

Post a Comment

Previous Post Next Post