मकर संक्रांतीला का घालतात काळे कपडे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं. पण, काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय. मकरसंक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो.

काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. काळ्या रंगाची वस्त्रे उष्णता शोषून घेऊन शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी झबली दिसू लागतात. नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्व देण्यात येते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते.

मकरसक्रांतीचे पौराणिक महत्त्व
मकरसंक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशी आख्यायिका आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच आपल्या देहाचा स्वेच्छाने त्याग केला होता. दक्षिणायनमध्ये जर आपल्या देहाचा आपण त्याग केला तर आपल्याला गती मिळणार नाही अशी भीष्मांची आस्था होती. त्यामुळेच त्यांनी उत्तरायण हा काळ निवडला होता. उत्तरायणाचे सहा महिने हे शुभ असतात असे भगवद्-गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी देखील म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post