एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
'नगर अर्बन बँकेचे तपासी अधिकारी दीपक चंगेडिया यांनी विरोधी मंडळातील सभासदांशी संगनमत करून कोणताही तपास न करता जाणीवपूर्वक बँकेला अपहाराचा खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे चंगेडिया यांची नार्को टेस्ट करण्यात यावी', अशी मागणी शेवगाव येथील बँकेच्या गांधी समर्थक सभासदांनी केली आहे.
शेवगावच्या नगराध्यक्ष राणी मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मन्सूरभाई फारोकी, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, काँग्रेसचे डॉ.अमोल फडके, मनसेचे गणेश रांधवणे, नगरसेवक कमलेश गांधी, अशोक आहुजा यांच्यासह जगदीश धूत, अमोल घोलप, किरण भोकरे, बापूराव धनवडे, प्यारेलाल शेख, सुरज लांडे, दत्ता फुंदे, सुनील रासने, कासमभाई शेख, अशोक खिळे आदींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना ई-मेलवर पाठवण्यात आले आहे. त्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत.
नगर अर्बन मल्टिस्टेट बँक ही ११० वर्षे जुनी ख्यातनाम संस्था असून माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती झपाट्याने झाली आहे. बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार गांधी यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. बँकेच्या विरोधी मंडळातील काही सभासद गांधी यांचा राजकीय पराभव करू शकत नसल्याने त्यांनी बँकेच्या हितास बाधा आणणारी अनेक कृत्ये वेळोवेळी केली आहेत. याचाच एक भाग म्हणून राजकीय आकस व व्यक्तीद्वेषातून गांधी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार दिलीप गांधी तसेच नगर अर्बन बॅंकेच्या संचालक मंडळावर राजकीय आकसापोटी दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा रद्द करावा, अशी मागणीही त्यांंनी केली आहे. ही मागणी करणारांमध्ये बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार तसेच विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Post a Comment