शरद पवार यांनी 'ते' वृत्त फेटाळले


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते विरोधी नेत्यांची भेट घेतील. शरद पवार यांनी दिल्ली दौऱ्याआधी न्यूज १८ शी बोलताना युपीए अध्यक्षपदासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी युपीए अध्यक्षपदी विराजनमान होण्याचं वृत्त फेटाळलं आहे.

“माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील युपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शऱद पवार यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं बोकं. “ही बातमी तुम्ही दिली आहे, अशा खोट्या बातम्या देऊ नका,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यांना उद्देशून म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post