Whatsapp वर तुम्हाला कोणी अश्लील मेसेज पाठवतंय का? ‘इथे’ करा तक्रार, होईल कारवाई


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सध्या आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेत. मित्र, नातलग, ऑफिसमधील कर्मचारी किंवा जवळच्या लोकांशी संपर्कात राहण्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यातही इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

WhatsApp वर दररोज असंख्य मेसेज फॉरवर्ड होतात. यातील काही महत्त्वाचे, कामाचे मेसेज असतात. पण, अनेक मेसेज फेक असतात किंवा अर्धवट माहितीसह शेअर केलेले असतात. यामुळे अनेकदा चुकीची माहिती युजरला मिळते. WhatsApp जितके फायदेशीर आहे, तितकाच त्याचा दुरूपयोगही केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना जेव्हा अन्य युजर्स अश्लील मेसेज पाठवतात तेव्हा मात्र त्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. विशेषतः महिला, तरुणींना या समस्येला अनेकदा तोंड द्यावं लागतं.

अशा युजर्सना ब्लॉक करण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आहे. पण, अनेकदा ब्लॉक केल्यानंतरही युजर दुसऱ्या नंबरवरुन त्रास द्यायला सुरूवात करतात. त्यामुळे अशावेळेस काय करावं हा अनेकांना प्रश्न पडतो. आता, अशाप्रकारे त्रास देणाऱ्यांची तुम्ही तक्रार करु शकतात. जर कोणी अश्लील मेसेज पाठवत असेल, जीवे मारण्याची धमकी देत असेल तर तुम्ही त्याविरोधात दूरसंचार विभागाकडे तक्रार करु शकता. यासाठी मोबाइल नंबरसह आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट ‘ccaddn-dot@nic.in’ वर ई-मेल करावा लागेल. त्यानंतर आवश्यक कारवाईसाठी दूरंसचार कंपन्या ती माहिती पोलिसांपर्यंत पोहचवतात. त्यामुळे जर भविष्यात कोणी अशाप्रकारे त्रास देत असेल तर तुम्ही घरबसल्या त्याची तक्रार करु शकता.

Post a Comment

Previous Post Next Post