मातांनी ड जीवनसत्त्व न घेतल्यास बालकांना मानसिक विकार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेकदा लहान मुले फार चंचल असतात ती एका ठिकाणी बसत नाहीत, त्यांचे लक्ष केंद्रित होत नाही, थोडक्यात त्यांना ध्यानाभाव व अतिसक्रियता (एडीएचडी- अटेन्शन डेफिसिट हायपर अॅदक्टिव्हिटी डिसॉर्डर) हा विकार असतो. पण हा विकार होण्याची शक्यता ज्या गर्भवती महिला ड जीवनसत्त्व कमी प्रमाणात घेतात त्यांच्या बालकांना होण्याची जोखीम अधिक असते, असे एका संशोधनात म्हटले आहे. एडीएचडी या विकारात कुठलीही व्यक्ती ही लक्ष केंद्रित करू शकत नाही व काही ठराविक कृती करण्याकडे तिचा कल असतो.

या विकाराबाबत लोकसंख्यात्मक पातळीवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, गर्भारपणात ज्या माता ड जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात घेत नाहीत, त्यांच्या मुलांना हा विकार होण्याची जोखीम असते. याशिवायही इतर काही घटक त्याला कारण असतात, असे फिनलंडमधील टुरकू विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.

जर्नल ऑफ दी अमेरिकन अॅोकेडमी ऑफ चाइल्ड अँड अॅतडोलसंट सायकिअॅअट्री या नियतकालिकात म्हटले आहे की, फिनलंडमध्ये १९९८ ते १९९९ मध्ये जन्मलेल्या १०६७ बालकांची तपासणी करणयात आली असता त्यांना एडीएचडी झाला होता, असे निष्पन्न झाले. त्यांचा इतर बालकांशी तुलनात्मक अभ्यास केला असता त्यांच्या मातांनी ड जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात घेतले नसल्याने हा विकार त्यांच्यात बळावल्याचे दिसून आले.

तज्ञांच्या मते ज्या माता गर्भारपणात पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्त्व घेत नाहीत त्यांच्या मुलांमध्ये चंचलता येण्याचा धोका असतो.

Post a Comment

Previous Post Next Post