झुरळांपासून सुटका हवी आहे ? करून पहा ‘हे’ घरगुती उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

घरात झुरळे असली तर ते कुणालाच आवडत नाही. पण या नावडत्या कीटकांना घरातून हद्दपार कसे करावयाचे, हे मात्र न सुटणारे कोडे असते. त्यांना मारण्यासाठी चपलेपासून अत्यंत महागड्या कीटकनाशकांपर्यंतचे उपाय योजले जातात. त्यांना दूर ठेवण्यासाठी लक्ष्मण रेषा मारल्या जातात. तरीही या कोणत्याच उपायांना दाद न देणारी ही अत्यंत कोडगी अशी जात आहे. आपल्याकडे दोन प्रकारची झुरळे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. १ ते १.५ लांबीची व काळ्या किंवा लाल रंगाची अमेरिकन झुरळे (पेरिप्लानेटा अमेरिकन) . या झुरळांपासून सुटकापासून करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच ट्राय केले पाहिजेत.

१. तमालपत्र 
मसाल्याच्या पदार्थांमध्ये आवर्जुन वापर करण्यात येणारा पदार्थ म्हणजे तमालपत्र. तमालपत्राचा वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे घरातील ज्या भागामध्ये झुरळांचा जास्त वावर आहे. त्या ठिकाणच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्रांची पानं चुरगळून ठेवावीत. त्यामुळे झुरळ पुन्हा याठिकाणी येत नाहीत. मात्र ही पानं दर आठवड्याला बदलावीत.

२. लवंग 
चवीला तीक्ष्ण आणि तसाच वास असलेली लवंग जशी आजारपणात गुणकारी ठरते तशीच ती झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. त्यामुळे झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावीत . मात्र त्यादेखील तमालपत्रांप्रमाणेच ठराविक वेळेनंतर बदलत रहावीत.

३. बोरिक पावडर आणि साखर 
बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावी. खासकरुन ज्या ठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर ही पावडर टाकावी.

४. कडूलिंबाची पानं
कडूलिंबाच्या पानांचे अनेक फायदे आहेत. अगदी शारीरिक व्याधींपासून ते घरामध्ये आढळणाऱ्या झुरळांना मारण्यापर्यंत. घरात झुरळांचा सुळसुळाट झाला असेल तर अशा ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर झुरळ असलेल्या ठिकाणी टाकावे. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळे झुरळ लवकर मरतात.

Post a Comment

Previous Post Next Post