तुमची त्वचा तेलकट आहे? मेकअप करताना घ्या ‘ही’ काळजी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कुठल्याही पार्टी, इव्हेंट किंवा कार्यक्रमात जायचं म्हटलं की महिलांची लगबग सुरु होते. अगदी कपड्यांपासून ते मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी याकडे त्यांचं लक्ष असतं. प्रेझेंटेबल असण्यासोबतच आपला चेहराही चांगला दिसावा यासाठी महिला मेकअप करतात. परंतु त्वचा कोणत्या प्रकारची आहे याची योग्य माहिती नसल्यामुळे केलेला मेकअप खराब होतो किंवा चेहरा खराब दिसायला लागतो. त्यामुळे मेकअप करताना कायम आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार मेकअप करणं गरजेचं आहे. काही जणांची त्वचा कोरडी असते, तर काही जणांची तेलकट तसंच काहींची त्वचा ही मिक्स स्वरुपाची असते. या साऱ्यामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्यांना मेकअप करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मेकअप करताना या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.

१. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी मेकअप करताना आपल्या त्वचेला सूट होईल अशाच सौंदर्य प्रसाधनांची निवड करावी.

२. मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धूवून घ्यावा.

३. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइजिंग करावे.

४. मेकअप करताना शक्यतो ऑईल बेस्ड क्रिम लावण्यासाठी वॉटर बेस्ड क्रिम लावावी. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.

५. चेहऱ्याचा टोन लक्षात घेऊन त्यानुसार फाऊंडेशन घ्यावं. तसंच फाऊंडेशन लावताना त्यात थोडंसं मॉइश्चराइजर मिक्स करावं. त्यानंतर तयार झालेली मिक्स क्रिम ओल्या स्पंजच्या मदतीने चेहऱ्यावर पसरवावं.

६. बऱ्याच वेळा महिला फाउंडेशन लावल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावत नाही. परंतु तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कॉम्पॅक्ट पावडर जरुर लावावी.

Post a Comment

Previous Post Next Post