कॉल क्वालिटीमध्ये Vi ची सरशी; एअरटेल, जिओला टाकलं मागे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

व्होडाफोन-आयडियानं (Vi) कॉल क्वालिटीमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलला मागे टाकलं आहे. दूरसंचार नियामक मंडळ ट्रायच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार यावेळी व्होडाफोन आयडिया ही कंपनी ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. ट्रायच्या वल्या आकडेवारीनुसार कॉल क्वालिटीमध्ये प्रथम क्रमांकावर आयडिया तर दुसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन यांना स्थान देण्यात आलं आहे.

ट्रायनं दिलेल्या माहितीनुसार कॉल क्वालिटीची ही माहिती युझर्सनं दिलेल्या फिडबॅकच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. ही माहिती ट्रायच्या MyCall Dashboard वरही उपलब्ध आहे. या माहितीमध्ये २जी, ३ जी आणि ४ जी या तिन्ही नेटवर्कचा समावेश करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये सरासरी ४.९ कॉल क्वालिटी रेटिंगनुसार आयडिया ही कंपनी पहिल्या स्थानावर होती. तर सरासरी ४.६ कॉल क्वालिटी रेटिंगद्वारे व्होडाफोन ही कंपनी दुसऱ्यास्थानावर होती. याव्यतिक्त बीएसएनएलला सरासरी ४.१ तर एअलटेल आणि जिओला सरासरी ३.८ इतकी रेटिंग देण्यात आली.

सध्या केवळ कॉल क्वालिटीच नाही तर नवे ग्राहक जोडण्यातही जिओ आता मागे गेलं आहे. एका अहवालानुसार एअरटेलनं गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्स जिओपेक्षा अधिक ग्राहक आपल्या नेटवर्कवर जोडले आहेत. सप्टेंबर महिन्यात एअरटेल सोबत ३८ लाख तरज जिओसोबत १५ लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले गेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post