जिल्हा बँकेचे रिंगण फुलले.. शरद पवारांच्या दौर्याकडे लक्ष


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीची रंगत हळूहळू वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या चार दिवसात दोन आजी व सात माजी आमदारांसह बँकेच्या विद्यमान अध्यक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ५०च्यावर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, साडेतीनशेवर कोऱ्या उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यास २५ जानेवारीपर्यंत मुदत असल्याने आणखी दिग्गज राजकीय नेत्यांचे अर्ज दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज 
नगर जिल्हा दौर्यावर आहेत. या दौर्यात जिल्हा बँक निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची चर्चा होणार असल्याचे समजते. त्यामुळे पवारांच्या दौर्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पाच वर्षांची मुदत संपल्याने मागील वर्षी म्हणजे मे-२०२०मध्ये अपेक्षित असलेली जिल्हा सहकारी बँकेची कोरोना-कोविडमुळे जवळपास दहा महिने लांबणीवर पडली. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सहकार क्षेत्रातील निवडणुकांना परवानगी दिल्याने जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या १४ तसेच शेतीपूरक व बिगर शेती संस्था मतदारसंघांच्या प्रत्येकी १ आणि राखीव मधील दोन महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती-भटक्या जमाती या मतदारसंघांची प्रत्येकी १ अशा २१ जागांसाठी येत्या २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सहकार प्राधिकरणाद्वारे होत असलेल्या या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. 

आतापर्यंत दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे - मतदारसंघ निहाय- विविध कार्यकारी सेवा संस्था- अकोले- विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर, संगमनेर-माधवराव कानवडे, जामखेड-जगन्नाथ राळेभात, कर्जत-अंबादास पिसाळ, पारनेर-दत्तात्रय म्हस्के, संगमनेर-दिलीप वर्पे व रंगनाथ फापाळे, श्रीगोंदे-माजी आमदार राहुल जगताप, श्रीरामपूर-करण ससाणे. बिगर शेती मतदारसंघ-सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड व भगवानराव पाचपुते. शेतीपूरक मतदारसंघ-माजी आमदार वैभव पिचड, गणपत सांगळे, माधवराव कानवडे, दादासाहेब सोनमाळी व सुभाष गुंजाळ. इतर मागासवर्गीय मतदारसंघ-अनिल शिरसाठ, अण्णासाहेब शेलार, दादासाहेब सोनमाळी व करण ससाणे. विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघ-गणपत सांगळे. महिला राखीव-संगीता वाघ, मीनाक्षी पठारे व लताबाई वांढेकर. अनुसूचित जाती जमाती-वैभव पिचड तसेच अकोले- गायकर सिताराम. जामखेड- राळेभात जगन्नाथ. कर्जत- पिसाळ अंबादास व शेवाळे कैलास. नगर- माजी आमदार कर्डीले शिवाजीराव व म्हस्के पद्मावती संपतराव पारनेर- म्हस्के दत्तात्रय, विद्यमान आमदार लंके निलेश, शेळके उदय पाटील सुजित. पाथर्डी- विद्यमान आमदार राजळे मोनिका व वाघ मथुराबाई. राहाता- म्हस्के आण्णासाहेब. राहुरी- तनपुरे अरूण व बानकर सुरेश, ढसाळ तानाजी. संगमनेर- कानवडे माधवराव व वर्पे दिलीप, फापाळे रंगनाथ. शेवगांव- घुले चंद्रशेखर. श्रीगोंदा- जगताप राहुल, नागवडे राजेंद्र. श्रीरामपूर- ससाणे करण व मुरकुटे भानुदास, पटारे दिपकराव. शेती पूरक तसेच शेती माल प्रक्रिया व पणन संस्थाचा मतदार संघ- सांगळे सिताराम, कानवडे माधवराव, पिचड वैभव, सोनमाळी दादासाहेब, गुंजाळ सुभाष, नवले मधुकर, मुरकुटे भानुदास, कर्डिले रोहिदास, शेळके रावसाहेब, धसाळ तानाजी, पठारे सुरेश, नागवडे राजेंद्र, सांगळे गणपतराव. बिगर शेती संस्थांचा मतदार संघ- गायकवाड सबाजीराव, गायकवाड प्रशांत, पाचपुते भगवानराव, नवले मधुकर, मुरकुटे भानुदास, बोरावके रवींद्र, निमसे शामराव, डौले शिवाजीराव, अभंग पांडुरंग, सोनवणे सुवर्णा, गुजर सचिन, महिला प्रतिनिधी मतदार संघ- वाघ संगिता, पठारे मिनाक्षी, वांढेकर लताबाई, तापकीर आशा, औटी जयश्री, पाटील सुप्रिया, म्हस्के पद्मावती, सोनवणे सुवर्णा. इतर मागास वर्ग- शिरसाठ अनिल, शेलार आण्णासाहेब, सोनमाळी दादासाहेब, ससाणे करण, तापकीर काकासाहेब, मुरकुटे भानुदास, कर्डिले रोहिदास, करपे सुरेश, बोरावके रवींद्र, अभंग पांडुरंग, फुलसौंदर भगवान, ढसाळ तानाजी, शेवाळे कैलास, पठारे दिपकराव, बेरड केशव, गुजर सचिन, पानसंबळ अरुण. अनु.जाती-जमाती- पिचड वैभव, डोळस नंदकुमार, बिठगर आशिष, आव्हाड अभय. विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य मतदार संघ- बिडगाव आशिष, आव्हाड अभय सांगळे गणपतराव.

आणखी बडी नावे प्रतीक्षेत

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ३ हजार ५७७ मतदार आहेत. या मोजक्या मतदारांच्या बळावर बँकेचे राजकारण सर्वपक्षीय दिग्गज राजकारणी करतात. मात्र, अजून निवडणुकीच्या रिंगणात बडी राजकीय नावे प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील विद्यमान आमदारांपैकी तसेच माजी आमदारांपैकी कितीजण रिंगणात उतरतात, याची उत्सुकता आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्ष या निवडणुकीत एकत्रित लढण्याची दाट शक्यता आहे. अर्थात जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणात शिवसेनेला फारसे अस्तित्व नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याने त्यांच्या माध्यमातून सेनेला बँकेच्या राजकीय वर्तुळात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात-यशवंतराव गडाख-चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली हे तिन्ही पक्ष रिंगणात उतरणार आहेत तर दुसरीकडे या महाविकास आघाडी विरोधात भाजपही स्वतंत्रपणे उतरणार आहे. अर्थात भाजपला आ. राधाकृष्ण विखे-शिवाजीराव कर्डिले-मधुकरराव पिचड या दिग्गजांची ताकद मिळणार आहे. त्यामुळे यंदाची बँकेची निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post