जरे हत्याकांड : राज्यातील पोलिसही आता बाळ बोठेचा शोध घेणार; स्टँडींग वॉरंट राज्यभर पोहोचलेएएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला शोधण्याचा प्रयत्न आता राज्यातील पोलिसही करणार आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील २१ पोलिस ठाण्यांना बोठेला शोधण्याबाबत स्टँडींग वॉरंटद्वारे आदेश दिले गेल्यानंतर शुक्रवारी राज्यातील एकूण सुमारे अकराशे पोलिस ठाण्यांना या स्टँडींग वॉरंटची माहिती देऊन त्यांच्या परिसरात कोठे बोठे दिसला तर त्याला तातडीने पकडण्याचे आदेश दिले गेले आहेत.

जरे खून प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी असल्याचे जाहीर झाल्यापासून बोठे पसार आहे. नगर येथे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली आहे. त्यात दुसरीकडे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट करता पारनेर न्यायालयामध्ये अर्ज केला होता, तो न्यायालयाने मंजूर केल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हाभरामध्ये सर्व पोलीस ठाण्यांना त्याबद्दलचे आदेश दिले होते व आता दुसऱ्या टप्प्यात बोठेच्यासंदर्भामध्ये राज्यभरातील सुमारे अकराशे पोलीस ठाण्यांना बोठे याला पकडण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या स्टँडींग वॉरंटची माहिती देऊन त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात कोठेही बोठे दिसला तर त्याला तात्काळ जेरबंद करण्याचे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान पसार बोठेचा अजून ठावठिकाणा लागलेला नाही. आतापर्यंत 30 ते 40 ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले आहे. आता नव्याने पुन्हा शोध मोहीम सुरू केली आहे. बोठेशी संबंधितांच्या चौकशासुद्धा केल्या असून अजूनही त्या सुरू आहेत. काही महिलांचेही जाबजबाब घेतले जात आहेत. मात्र, बोठे जर सापडला नाही तर न्यायालयाकडून तो फरार घोषित करण्यासाठी सुद्धा पोलीस पुढील कारवाई करणार आहेत व त्याच्या मालमत्तेवरसुद्धा जप्ती आणण्याच्यादृष्टीने आवश्यक कायदेशीर कारवाईचा आधार घेतला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post