'त्यांची' माहिती तातडीने प्रशासनाला द्या : जिल्हाधिकारी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

युरोप वा इतर देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासन वा आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबादमार्गे येऊ शकतात. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास करुन अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाने संकलित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.

प्रशासन सज्ज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सज्ज असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी कोणत्याही प्रकारे हा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्या अनुषंगाने चाचण्यांमध्ये पॉझिटीव आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिक शोधणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच बाहेरील देशात प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांचा शोध घेणे आणि त्यांची चाचणी करणे आवश्यक असल्याने ही माहिती प्रशासनास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post