मनपा आयुक्तांनी जाता-जाता काढलेले सर्व आदेश स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी निवृत्तीच्या दिवशी 31 डिसेंबर रोजी काढलेले सर्व आदेश स्थगित करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त पदाचा कारभार सध्या जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आहे. 31 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कालच सर्व आदेशांची माहिती मागवली होती. हे सर्व आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केले आहेत. उपायुक्त प्रदीप पठारे यांनी स्थगिती बाबतचे आदेश काढले आहेत.

आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची नगर सचिवपदी करण्यात आलेली बदली, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे सोपविण्यात आलेले आस्थापना विभागाचे कामकाज, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्याकडे आरोग्य विभागाचे संबंधित सोपविण्यात आलेले सर्व विभागाचे नियंत्रण, पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार यासह इतर सर्व विभागांनी 31 डिसेंबर रोजी जे-जे आदेश आयुक्तांमार्फत करून घेतले होते, हे सर्व स्थगित करण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post