नगर मनपाच्या 'या' मुख्याध्यापकाला राज्यस्तरीय पुरस्कार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर महापालिकेच्या पहिल्या आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या केडगाव-ओंकारनगर शाखेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. महापालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला असा पुरस्कार मिळण्याची घटना तशी विरळच म्हणावी लागेल. पण यानिमित्ताने नगर महापालिकेच्या लौकिकात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भाऊसाहेब कबाडी यांनी महापालिकेच्या ओंकारनगर प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळेच ३५० पुरस्कार नामांकन प्रस्तावांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शिक्षण विवेक व डॉ.टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन (सांगली) यांच्यावतीने दिला जाणारा 'शिक्षण माझा वसा... युवा राज्यस्तरीय उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार-२०२१' हा महापालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव अहमदनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासन केंद्र (डेक्कन-पुणे) येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे, लेखक शरद कुंटे, डॉ. टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन अॅड.किशोर लुल्ला, शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर, एचडीएफसी बँक मॅनेजर राहुल देशमुख यांच्या हस्ते कबाडी यांना हा पुरस्कार देण्यात आला.६ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

पुरस्काराबद्दल केडगाव येथील नगरसेविका सुनीता कोतकर, नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका शांताबाई शिंदे, नगरसेवक विजय पठारे तसेच अहमदनगर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर,माजी मनपा उपायुक्त रामकिसन देशमुख, पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे, एल.आय.सी.विकास अधिकारी तुषार देशमुख, पित्रोडा सेल्सचे परेश पित्रोडा, सप्तरंग प्रिंटवल्डचे नंदेश शिंदे, अवधूत मोबाईलचे अजित पवार,विषयतज्ञ अरुण पालवे,नपा व मनपा शिक्षक संघ राज्यसरचिटणीस अरुण पवार,मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनिषा शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण मुळे, उपाध्यक्ष रवींद्र पानसरे, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी कबाडी यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post