फोर्ब्स मॅगेझीनमध्ये झळकला नगरचा युवक; डॉ. हरके यांच्या विक्रमांची घेतली दखल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

व्यवसाय विश्वात फोर्ब्स मॅगझिन हा 100 वर्षांचा जुना ब्रँड आहे आणि ते व्यवसाय विश्वातील सर्वात जास्त ओळखले जाणारे सन्मानीत नाव आहे. या मॅगेझीनमध्ये नगरचा युवक झळकला आहे. नगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा तज्ज्ञ ड़ॉ. दीपक हरके यांनी ध्यानधारणा प्रचार व प्रसारासाठी केलेले प्रयत्न व यासाठी केलेले तब्बल १७४ विश्वविक्रम यांची दखल फोर्ब्स मॅगेझीनने घेतली आहे. यानिमित्ताने जागतिक व्यावसायिक विश्वात नगरचा आगळावेगळा सन्मान झाला आहे.

२००० मध्ये फोर्ब्स मॅगेझीन हा ब्रँड भारतात सुरू झाला आणि थोड्याच अवधीत त्याने स्वत:ला देशाचे प्रीमियर बिझिनेस मॅगझीन म्हणून स्थापित केले. फोर्ब्स इंडियाच्या सामग्रीने लोकांच्या जीवनात एक नवीन दृष्टीकोन आणला आहे आणि देशातील सर्वात प्रभावी व्यवसाय मासिक म्हणून ते विकसित झाले आहे. मॉडर्न इंडियाज गेम चेंजर्स असे शीर्षक असलेल्या फोर्ब्स मॅगेझीनच्या अंकामध्ये डॉक्टर दीपक हरके यांच्या कार्याची दखल घेतली आहे. राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना डॉ. दीपक हारके यांनी फोर्ब्स मॅगझिन भेट दिले.

पावणे दोनशे विक्रम
१७४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. हारके यांनी सर्वात मोठी रांगोळी, सर्वात मोठे शुभेच्छा पत्र,सर्वात मोठे वर्तमानपत्र,सर्वात मोठी पतंग, सर्वात मोठे पोस्ट कार्ड, सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र, सर्वात मोठे पॅम्प्लेट,सर्वात मोठी ट्रॉफी, सर्वात मोठे पुस्तक, सर्वात मोठा वेडिंग बुके, सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग,सर्वात छोटी राखी, सर्वात छोटे कमळ, सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट, सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ, या सारखे १७४ विश्वविक्रम करून भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. ते मागील ३१ वर्षांपासून राजयोगाचा प्रसार व प्रचार करीत आहेत व याबद्दल त्यांना याआधी इंटरनॅशनल अचिएव्हमेन्ट अवॉर्ड, इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड, इंडिया एक्सलेन्स अवॉर्ड, इंडियन ग्लोरी अवॉर्ड, इंडियन प्राईड अवॉर्ड, इंडियास सिगनेचर ब्रँड अवॉर्ड, भारत गौरव अवार्ड, इंडिया थाई फ्रेंडशिप अवॉर्ड, भारत गौरव अवॉर्ड असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post