उड्डाणपुलाचे पुन्हा भूमिपूजन; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार 
सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी त्यांची व्हीआरडीई संस्थेला भेट तसेच केके रेंज बाधित २३ गावांच्या सरपंचांची त्यांची भेट घडवून दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नगरच्या बायपास मजबुतीकरणासाठी 800 कोटी तसेच नगर ते शिर्डी रस्त्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर झाले असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ७ मार्चला या दोन्ही कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचेही डॉ. विखेंनी सांगितले. 

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत डॉ. विखे यांनी नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन कशासाठी केले जात आहे, हेच समजत नाही. एसी, कुलर, खाण्यास पिझ्झा, झोपायला गाद्या असे व्हीआयपी आंदोलन आम्ही आमच्या ५० वर्षांच्या राजकारणात कधी पाहिले नाही. या आंदोलनात पाकिस्तानचे ट्विटर हँडल कार्यरत आहे, असा अहवाल आहे. या आंदोलनात ७५ टक्के शेतकरी व २५ टक्के समाजकंटक आहेत. पण एका राज्यातील हे शेतकरी असल्याने कृषी कायद्यात बदल होऊ शकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post