एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सराईत व फरार गुन्हेगार सापडतात, पण पत्रकार बाळ बोठे का सापडत नाही, असा सवाल येथील ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश लगड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री व पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
कार्यक्षम पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगरला आल्याने तमाम नगरकरांना खूप आनंद झाला आहे. पाटील यांच्या अधिपत्याखाली पोलिस दलास अनेक गुन्ह्यातील आरोपी सापडतील, अशी आमची अपेक्षा आहे. आता आमची एक विनंती आहे की, आपण रेखा जरे हत्याकांडाच्या गुन्ह्याच्या तपासाचा वेग वाढवावा व कुठल्याही परिस्थितीत पत्रकार बाळ ज. बोठे या आरोपीच्या मुसक्या आवळा. अन्यथा, समाजात आपल्या अधिपत्याखालील कार्यक्षम अशा पोलिस दलाबद्दल चुकीचा संदेश जाईल, असा इशारा या पत्रात अॅड. लगड यांनी दिला आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अनेक सराईत व फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. मात्र डॉक्टर-वकिलीची डिग्री संपादन करणारा मास्टर माईंड आपणास शोध घेऊन सापडत नाही, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. आज या प्रकरणाकडे नगर जिल्ह्याचे नवे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. हा आरोपी आपल्या अधिपत्याखाली कार्यक्षम अशा पोलीस दलाला का सापडू शकत नाही? अनेक वर्षापासून पसार असलेले डॉ. शेळके व कासार सारखे आरोपी सापडू शकतात, मग हा कायद्याचा उच्चविभूषित पदवीधर आरोपी का सापडू शकत नाही? असा प्रश्नही अॅड. लगड यांनी यात उपस्थित केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनाही निवेदनाद्वारे त्यांनी बोठेला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार (मास्टर माईंड) पत्रकार बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पन्न झाल्यापासून तो पसार आहे. रेखा जरे हत्याकांडातील इतर पाच आरोपी आपल्या पोलिस दलाने तात्काळ जेरबंद केले. मात्र, गुन्हा घडून जवळपास 2 महिने होत आले तरी हा सहावा आरोपी बोठे आपल्या कार्यक्षम अशा पोलिस दलाला सापडत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयात कसा फेटाळला जाईल, यासाठी स्वतः तपासी अधिकारी यांनी हजर राहून प्रयत्न करावेत व त्याला अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment