जरे हत्याकांड : 'बाळ'च्या शोधासाठी पोलिसांचे छापासत्र सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या शोधासाठी पोलिसांचे छापा सत्र सुरू झाले आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने स्टँडींग वॉरंट दिल्याने व त्याची माहिती राज्यभरातील पोलिसांसह देशातही प्रमुख शहरांतून दिल्यावर स्थानिक स्तरावर जिल्हा पोलिसांनी बोठेचा ठावठिकाणा लावण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारून शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे यांची हत्या होऊन आता दीड महिना होत आला आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या शोधासाठी बुधवारी तीन ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. मात्र, त्याठिकाणी तो सापडला नाही. गुरुवारीही पोलिस पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. पण त्यांनाही यश आले नाही. पोलिसांच्या पथकाला तो काही ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह अन्य नेमण्यात आलेल्या पथकाने त्याचा तीन ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी तो आढळून आलेला नाही. तो त्या ठिकाणी येऊन गेला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या छापेसत्राच्या माध्यमातून त्याचीही खातरजमा करण्यात आली आहे. 

दरम्यान, बोठे यांचा ठावठिकाणा लागयला तयार नाही. त्यामुळे आता पोलीस पथकाने वेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. त्याच्या मालमत्ता कुठे आहेत, यासह तो कोठे भागीदार आहेत का या माहितीच्या संकलनासह त्यांच्या संपर्कामध्ये कोण असू शकतो, याचा अंदाज पोलिसांना आला असून त्यादृष्टीकोनातून त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचे समजते. पोलिसांचे पथक सुद्धा आता त्या अनुषंगाने तपास करून आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post