नगरचे डॉ. संकेत ठरले किडनी वॉरियर योद्धा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जगभरातील किडनी वॉरियार योद्ध्यांसाठी देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्रातील एकमेव व नगरमधील आनंदऋषी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डायलिसिस विभागाचे मुख्य तंत्रज्ञ डॉ. संकेत पुरोहित यांना मिळाला आहे. दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार ऑनलाईन देण्यात आला. त्यांच्या या यशाचा आनंद आनंदऋषिजी रुग्णालयात डायलिसीस उपचार घेणाऱ्या रुग्णांनी साजरा केला व डॉ. संकेत यांचा विशेष गौरवही केला.

आनंदऋषिजी रुग्णालयात डायलिसिस आणि सर्व उच्च वैद्यकीय सेवा दिली जाते. किडनी विकाराने आजारी असलेल्यांना डायलिसीस उपचार महत्त्वाचे असतात. या उपचारांसाठी तंत्रज्ञ डॉ. संकेत पुरोहित यांनी विशेष योगदान दिल्याने त्यांना किडनी वॉरियर्स योद्धा पुरस्कार मिळाला. तज्ञ डॉ.संकेत पुरोहितसारख्यांमुळे आनंदऋषीचा डायलिसिस विभाग देशात अव्वल ठरल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यांनी डॉ. संकेत यांच्या गौरव समारंभात व्यक्त केली. यावेळी परमजीत सभरवाल यांनी पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेचा पुरस्कार आनंदऋषी हॉस्पिटलला मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सर्वसामान्य गरीब रुग्णांना अल्प दरात आरोग्य सेवा देण्याची जैनमुनी आचार्यश्री आनंदऋषीजी यांनी संकल्पना मांडली. आदर्शऋषी आणि सहकार्‍यांनी ती आनंदऋषिजी हॉस्पिटलच्या रुपाने प्रत्यक्षात आणली. संतोष बोथरा व सर्व सहकारी सदस्यांनी ती पूर्णत्वास नेली. मात्र, डॉ. आशिष भंडारी, डॉ. गोविंद कासट आणि सेवाभावी डॉक्टरांनी निःस्पृह सेवेचा कळस चढवून आनंदऋषी डायलिसिस विभाग आज देशात अग्रेसर केला. केवळ सुसज्ज आधुनिक सामुग्रीच नव्हे तर सेवाभावी वृत्ती हे येथील वैशिष्ट्य असून डॉ. संकेत पुरोहित यांना मिळालेला किडनी वॉरियर्स योद्धा हा देश पातळीवरील पुरस्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन नवनीत विचार मंच आणि नगर पर्यटन महोत्सवाचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी केले. संकेत पुरोहित यांचा गौरव म्हणजे संपूर्ण हॉस्पिटलचा सन्मान असल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. डॉ. आशिष भंडारी, किडनी विकार तज्ञ डॉ. गोविंद कासट, प्रकाश मुनोत, दीपक धेंड, डॉ. यशोदीपा कांकरिया, परमजीत सभरवाल, रवि बोरसे, आदित्य पावसे, सतीश संचेती, प्रकाश गडे, रमेश सावंत, तंत्रज्ञ कर्मचारी बाळासाहेब लहरे, बाळू दळवी, तुषार गाडेकर, प्रवीण बोर्डे, छाया गादे, प्रज्ञा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

आनंददर्शन डायलिसिस क्लब
डायलिसिस रुग्णांसाठी आनंद दर्शन डायलिसिस क्लब सुरू करणार असून किडनी रुग्णांना वैद्यकीय मार्गदर्शन, त्यांच्यात जागृती आणि प्रसंगी आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी पत्रकार मेहता यांनी केली. डॉ. कासट यांनी लवकरच किडनी रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू होत असून त्याचा रुग्णांनी फायदा घेण्याचे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post