एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
भारतीय सैन्यदलात भरती होऊन त्याला देशसेवा करायची आहे. त्यादृष्टीने तो अविरत प्रयत्न करतोय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हातात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन तो तब्बल ७२ किलोमीटर धावणार आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथील सौरभ जाधव हा युवक हे धाडस करणार असून, यानिमित्ताने विश्वविक्रमही प्रस्थापित करणार आहे. प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला पुण्यातील मगरपट्टा येथून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक दौडमध्ये ६३ धावपटू सहभागी होणार आहेत. १४ तासात ७२ किलोमीटर धावण्याचे उद्दिष्ट असले तरी सौरभने हे आव्हान अवघ्या ९ तासात पार करण्याची जिद्द मनात बाळगली आहे.
अकोळनेर (तालुका नगर) येथील उदयोन्मुख धावपटू सौरभ जाधव येत्या प्रजासत्ताकदिनी हाती तिरंगा ध्वज घेऊन 72 किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे. हे अंतर 14 तासापेक्षा कमी वेळेत कापून तो आपल्या विक्रमाची नोंद करणार आहे. सौरभ जाधव हा मूळचा अकोळनेर येथील आहे. अकोळनेरचे माजी सरपंच अरुण जाधव यांचा तो पुतण्या आहे. सौरभचे वडील पोपट जाधव यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. मात्र, त्यांचे ते स्वप्न अधुरे राहिले. पोपट जाधव यांचे कुटुंब कामानिमित्त हडपसर (पुणे) येथे स्थायिक झाले आहे. सौरभचे प्राथमिक शिक्षण मामाकडे कोंडेगव्हाण (तालुका श्रीगोंदा) येथे तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विद्यालय (अकोळनेर) येथे झाले. लहानपणापासूनच सौरभला खेळाची आवड होती. तो सध्या एस.एम.जोशी कॉलेज (हडपसर) येथे कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू महेंद्र बाजारे हे त्याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत तर संदीप टेळेकर, निलेश मिसाळ, अमृता पंडित, शेरसिंह यांचे देखील त्यास मार्गदर्शन मिळत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई सीता जाधव या आपल्या मुलाचे धावपटू होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी धडपडत आहेत. स्पर्धेचे आयोजन इंडियन फ्लॅग रनर्स या संस्थेचे सुदर्शन सिंग व तेजेंद्र सिंग यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनी हातात तिरंगा घेऊन 72 किलोमीटर अंतर 14 तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केल्यास इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या नावाची नोंद होणार आहे. तसे झाल्यास अकोळनेरचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. येत्या 26 जानेवारी रोजी सौरभ पुणे येथील मगरपट्टा येथून जागतिक विश्वविक्रमासाठी धावण्यास प्रारंभ करणार आहे. भारतातून 63 धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कुठेही न थांबता 9 तासात 72 किमी अंतर पार करण्याचा त्याचा मानस आहे. हा विक्रम प्रस्थापित करताना प्रणाली जाधव ही धावपटू त्याच्या सहाय्याला असणार आहे. 12 किमी, 32 किमी हाफ मॅरेथॉन, गणेगाव मॅरेथॉन 21 किमी, पुणेकर हाफ मॅरेथॉन 5 किमी आदी स्पर्धांमधून तो आजवर धावला आहे. अनेक बक्षिसे व मेडल्स त्याच्या नावावर जमा आहेत. भारतीय सैन्यात भरती होण्याचे वडिलांचे अधुरे राहिलेले स्वप्न सौरभला पूर्ण करायचे आहे व भारताला सुवर्ण पदक मिळवून द्यायचे त्याचे ध्येय आहे.

Best of luck saurabh...
ReplyDeletePost a Comment