शेवगाव दुहेरी मृत्यूंचा तपास सुरू; प्राणी हल्ल्यात मृत्यूचाही संशय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे रविवारी सकाळी सापडलेल्या महिला व मुलगा अशा दोन मृतदेह प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हे दोन्ही मृत्यू प्राणी हल्ल्यात झाले की ते खून आहेत, याचा तपास सुरू केल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शेवगाव येथील आयटीआय मैदानात रविवारी सकाळी दोन मृतदेह सापडले यात एक महिलेचा मृतदेह असून त्याला त्याला शीर नाही, फक्त धड आहे तसेच एका मुलाचाही मृतदेह येथे सापडला आहे. या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, सापडलेल्या दोन्ही मृतदेहांबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह लोणी येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर या मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार फिरस्ते असलेले तीन जण शेवगावला आले होते. शेवगावमधील गावाबाहेरील सुनसान अशा ठिकाणी ते राहिले. या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह मिळालेले आहेत. तिसरा व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच महिला व मुलाच्या मृत्यूबाबत तपास सुरू असून प्राण्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला काय की त्यांचे खून झाले आहेत, याचा तपास सुरू आहे. सापडलेल्या दोन्ही मृतदेहांची अद्याप ओळख पटली नाही. मात्र, या दोन्ही मृत्यूबाबत अंधश्रद्धेच्या दृष्टीने अजून तरी कोणताही पुरावा मिळालेला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post