स्नेहालयने दिला अल्पवयीन पिडितेला आधार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रकार वारंवार घड़ला. त्यातून ती गर्भवती राहिली. पोलिसात गुन्हा दाखल झाला. पण अल्पवयात लादल्या गेलेल्या गर्भारपणामुळे मानसिक व शारीरिक अस्वस्थ असलेल्या या पिडितेला येथील स्नेहालय संस्थेने आधार दिला आहे. तिची जबाबदारी या संस्थेने घेतली असून, तिचे समुपदेशन व तिच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू करण्यात आले आहेत.

नगर तालुक्यातील एका १६ वर्ष वयाच्या व इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. या मुलीची पुढील जबाबदारी स्नेहालय संस्थेने घेतली आहे. तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी तिचा चुलत नातेवाईकच असून याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली. यामुळे पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब स्नेहालयाच्या निदर्शनास आली. स्नेहालय संस्थेच्या मदतीने पिडीत मुलीने याप्रकरणी गावातील आरोपी विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका गावातील शेतात नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते ४ जुलै २०२० या दरम्यान घडला. त्यामुळे ही पिडीत विद्यार्थिनी गर्भवती असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी स्नेहालयच्या सदस्या प्राची वाबळे यांनी सातत्याने या अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केले. पिडीता ही वयाने लहान असल्याने आणि तिला काळजी व संरक्षण तसेच वैद्यकीय मदतीची गरज असल्याने बाल कल्याण समितीच्या आदेशाने तिला स्नेहालय संस्थेत ठेवण्यात आले आहे. येथे पुढील सर्वतोपरी मदत या बालिकेला मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post