नगरच्या सुरभि हॉस्पिटलची प्रगतीकडे भरारी; रविवारी विस्तारित इमारतीचे उद्घाटन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

येथील औरंगाबाद रस्त्यावरील महाराजा हॉटेलजवळ (गुलमोहोर रोड कॉर्नर) असलेल्या सुरभि हॉस्पिटलने अल्पावधीत प्रगतीची भरारी घेतली आहे. स्थापनेनंतर अवघ्या अडीच वर्षातच विस्तारित इमारतीद्वारे अति आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर अधिक प्रभावी रुग्णसेवा या रुग्णालयाद्वारे आता केली जाणार आहे. पूर्वीचे ६५ खाटांचे हे हॉस्पिटल आता विस्तारित इमारतीच्या माध्यमातून २५० खाटांच होत असून, या नव्या इमारतीचे उदघाटन येत्या रविवारी (२४ जानेवारी) दुपारी दीड वाजता ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

सुरभि हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राकेश गांधी यांनी १२ सहकारी डॉक्टरांच्या मदतीने सुरभि हॉस्पिटल मे २०१८मध्ये सुरू केले आहे. आता या टीममध्ये आणखी १५ डॉक्टर सहभागी झाले असून, २७ डॉक्टरांची फॅमिली सुरभिची वैद्यकीय सेवा अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवणार आहेत. सुरभि हॉस्पिटलची नवी इमारत ९ मजल्यांची असून वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर उपचार सुविधा यात करण्यात आल्या आहेत. २५० खाटांच्या या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ब्लड बँकेसह ५० खाटांचा क्युबिकल अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट, हृदय व झडपांच्या व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारा सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, न्यूरो ट्रॉमा केअर, ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, जनरल मेडिसिन अँड क्रिटीकल केअर युनिट, विषबाधा, सर्पदंश, पॅरेलिसिस, दमा उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचार आणि शस्त्रक्रिया केंद्र, प्लास्टिक सर्जरी आणि पुनर्रचनात्मक सर्जरी, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, मूत्रविकार उपचार व शस्त्रक्रिया, पोटविकार निदान व उपचार, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, कॅप्सूल एन्डोस्कोपी, लेप्रोस्कोपिक अॅन्ड बॅरिॲट्रिक सर्जरी युनिट, मूळव्याध, भगंदर शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण विभाग, सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, २-डी इको कार्डियाक कलर डॉप्लर, स्ट्रेस टेस्ट, मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओग्राफी, अत्याधुनिक सिटीस्कॅन मशिन, १५ खाटांचे डायलिसिस युनिट, अत्याधुनिक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, स्वतंत्र फिजियोथेरेपी युनिट येथे आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहेत. त्यामध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुहास हरदास, डॉ. अमित भराडीया, हृदय शल्यचिकित्सक डॉ. इब्राहिम पटेल, अतिदक्षता विभाग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रियन जुनागडे, पोट विकार आणि लिव्हर तज्ज्ञ डॉ. वैभव अजमेरे, ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट व मणके विकार तज्ज्ञ डॉ. विलास व्यवहारे, कॅन्सर आणि किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. तुषार मुळे, प्लास्टिक अँड कन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. रोहित फुलवर, दुर्बिणीद्वारे व लेझर शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. श्रीतेज जेजुरकर, बाल आरोग्य आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अजित ठोकळ, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुलभा पवार-जंजीरे, डॉ. स्वाती जेजूरकर, डॉ. संयुक्ता सारडा, रेडिओलॉजिस्ट डॉ. संकेत सारडा, डॉ. स्वाती घुले, डॉ. कोमल अजमेरे, भूलतज्ञ भूषण लोहकरे, हिस्टोपॅथॉलॉजिस्ट डॉ. इम्रान शेख, डॉ. आशिष भंडारी यांचा समावेश आहे.

मान्यवर राहणार उपस्थित
सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारत उदघाटन समारंभास आ. अरुणकाका जगताप, पालक मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच ना. शंकरराव गडाख, ना. प्राजक्तदादा तनपुरे, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. संग्राम जगताप उपस्थित राहणार आहेत. सुरभि हॉस्पिटलमधील क्युबिकल अतिदक्षता विभाग हा जिल्ह्यातील पहिलाच प्रगत आणि १८ व्हेंन्टिलेटर्ससह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा अतिदक्षता विभाग आहे. शस्त्रक्रिया विभागात ३ शस्त्रक्रिया कक्ष असून वैद्यकीय मानकांनुसार त्यांची रचना केलेली आहे. त्यामुळे भविष्यात 'किडनी-लिव्हर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या' शस्त्रक्रिया देखील सुरभि हॉस्पिटलमध्ये होऊ शकतील.

Post a Comment

Previous Post Next Post