ग्राहक पंचायतीची विषयनिहाय जागृती; १२ तज्ज्ञांची नियुक्ती


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ग्राहकांचा नेहमी संबंध येणाऱ्या विविध विषयांची तज्ज्ञांद्वारे जनजागृती करण्याची नवी संघटनात्मक रचना अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे. सायबर क्राईम, बांधकाम, बँक व्यवहार, कृषी, वैद्यकीय-आरोग्य, विधी व न्याय, उर्जा-महावितरण, महिला संघटन, शिक्षण, प्रवासी अशा १२ विषयांच्या तज्ज्ञांच्या मदतीने त्या-त्या विषयाची जनजागृती तसेच त्या-त्या विषयातील ग्राहकांच्या समस्यांच्या सोडवणुकीची मोहीम यापुढे ग्राहक पंचायतीद्वारे राबवली जाणार आहे.

(स्व.) बिंदू माधव जोशी यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून देशभरात उभी केलेली ग्राहक जनजागृती चळवळ आता विकेंद्रीकरणातून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन झाले आहे. पूर्वी ग्राहक पंचायतीची जिल्हा कार्यकारिणीच ग्राहकांचे सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यात कार्यरत होती. आता याच जिल्हा कार्यकारिणीच्या मदतीला ग्राहकांशी संबंधित विविध विषयांच्या तज्ज्ञांची टीम असणार आहे. या तज्ज्ञांद्वारे त्या-त्या विषयात होत असलेल्या बदलांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासह त्या विषयातील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यालाही चालना दिली जाणार आहे.

नगर जिल्ह्याच्या स्तरावरही आता जिल्हा कार्यकारिणीसमवेत १२ तज्ज्ञांची स्वतंत्र समिती केली गेली आहे. अशी रचना महाराष्ट्र प्रांत स्तरावरही केली गेली आहे. प्रांत स्तरावर १० जिल्हे व २ महानगरांच्या स्तरावर अशा समित्या करण्यात आल्या असून, भविष्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात अशीच समिती रचना असणार आहे. त्यानंतर प्रांत स्तरावरून जिल्हा व तालुका स्तरावरील अशा समित्यांच्या समन्वयातून विविध ठिकाणच्या ग्राहकांची जनजागृती, समस्यांचे संकलन व सोडवणूक मोहीम राबवली जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील अशा विषय तज्ज्ञांच्या जिल्हा प्रतिनिधींची समिती अशी-1) सायबर क्राईम व बॅंक समिती- दिनेश थोरात (संगमनेर, मो.नं.- 9766074467). 2) प्रबोधन समिती-शाहूराव औटी (पारनेर. मो. नं. -9890875099). 3) प्रसिध्दी समिती-श्रीराम जोशी (नगर, मो. क्र.-9822511133). 4) ग्राहक संरक्षण फुड, ड्रग व वजन माप समिती- नकुल चंदे (नगर, मो नं.9423792984). 5) कृषी समिती-हरिभाऊ चौधरी (पारनेर, मो. नं.9545449441). 6) वैद्यकीय व आरोग्य समिती:- डॉ.प्रसन्नकुमार खणकर ( नगर, मो. नं.-9822785554) 7) विधी व न्याय समिती- अॅड. आदिनाथ बाचकर (नगर-मो.नं.7972450700) 8) महिला जिल्हा संघटन समिती:- सुचेता कुलकर्णी (नगर, मो नं.9922580779). 9) ऊर्जा व महावितरण-अशोक शेवाळे (शेवगाव, मो. नं.९४०५२१७९०१.) 10) प्रवासी जिल्हा संघटन- रामकृष्ण थोटे (नेवासे, मो नं 9527705445). 11) बांधकाम जिल्हा संघटन समिती- गिरीश अग्रवाल (नगर, मो नं 99 22112244). १२) शिक्षण विषयक संघटन समिती- जालिंदर आहेर (पारनेर, मो. नं. 7709134316)

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची नवी नगर जिल्हा कार्यकारिणी अशी- जिल्हाध्यक्ष-विलास जगदाळे (नगर, मो - 9765986601), जिल्हा उपाध्यक्ष- अमिता कोहली (नगर, मोबा-9271564076), जिल्हा संघटक- अतुल कुऱ्हाडे (नगर, मोबा - 9420642021), जिल्हा सचिव-सुरेश राहाणे (संगमनेर, मोबा-9767063100), जिल्हा कोषाध्यक्ष- सीताराम बोरुडे (पारनेर मोबा- 9860356971) जिल्हा कार्यकारिणी सदस्य - बन्सीधर आगळे (शेवगाव, मोबा- 9270769746).

Post a Comment

Previous Post Next Post