'या' पुरस्कारासाठी तुम्हीही सूचना पाठवू शकता


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

क्रीडा क्षेत्रात मानाचा समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तसेच अन्य क्रीडा पुरस्कारांच्या सुधारित नियमावलीसाठी सूचना व अभिप्राय पाठविण्याचे आवाहन राज्यातील महाविकास आघाडी सरकारद्वारे करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णय २४ जानेवारी २०२० नुसार निर्गमित केलेली आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करावयाच्या असल्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाने यांनी कळविले आहे. त्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय २२ जानेवारी २०२१ पर्यंत मागविण्यात आले आहेत.

राज्य सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या क्रीडा पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या ( https://sports.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सूचना वा अभिप्राय ( dsysdeskI4@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in ) मेलवर २२ जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवकसेवा संचालनालय (शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे) यांच्याशी संपर्क साधावा, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post