नारी शक्ती पुरस्कार हवाय.. ऑनलाईन अर्ज करा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनामार्फत दरवर्षी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले जातात. 

राष्ट्रासाठी कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था तसेच समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन अशा महिला, संस्था यांना हा पुरस्कार दिला केला जातो. अशा महिला, स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने अहमदनगर जिल्हयातील नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे ( www.narishaktipuraskar.wcd.gov.in) आणि ( www.wcd.nic.in )या वेबसाईटवर दिनांक 30 जानेवारी, 2021 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात (पहिला मजला, अर्पित हाऊस, संजय जव्हेरी यांची इमारत, सर्जेपुरा, अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 0241- 2431171) संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post