एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
परळी पीपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवींची रक्कम तसेच इतर ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या ठेवींच्या रकमेपैकी ११ कोटी ४२ लाख ४० हजार ८१० रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या तत्कालीन उपाध्यक्षासह जनरल मॅनेजर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व एका महिला संचालकांच्या पतीच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. दरम्यान, ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत संजय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. या अपहार प्रकरणातील आरोपीमध्ये तत्कालीन उपाध्यक्ष नितीन घुगे (सध्याचे चेअरमन), जनरल मॅनेजर विश्वजीत ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलेश मानुरकर व संचालिका निमीषा खेडकर यांचे पती प्रमोद किसन खेडकर यांचा समावेश आहे. यांनी संबंधित शाखाधिकारी व कॅशियर यांच्याशी संगनमत करून अपहार केल्याचे लेखा परीक्षण अहवालावरून निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा रकमेचा, अपहाराचा, किचकट, क्लिष्ट, गुंतागुंतीचा व अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.
पोलिसांचे आवाहन
परळी पीपल्स अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या नगर जिल्हयात श्रीरामपूर, नेवासा, तिसगाव, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी येथे शाखा होत्या. सदर शाखांमध्ये ठेवीदारांनी मोठया प्रमाणात ठेवी ठेवलेल्या आहेत. यापैकी, ज्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची मुदतपूर्ती होवुनही पैसे परत मिळाले नाहीत, तसेच ठेव ठेवलेली शाखा बंद पडली असेल, अशा ठेवीदारांनी त्यांच्या मुळ मुदतठेव पावत्या व त्याच्या छायांकित प्रती गुन्हयाच्या तपासासाठी आवश्यक असल्याने व ठेवीदार यांच्याकडे विचारपुस करुन त्यांच्या गुंतवणुकीची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच सदर ठेवीदारांनी व साक्षीदारांनी ठेवीची परतफेड मिळण्यासाठी करायच्या अर्जाचा नमुना आर्थिक गुन्हे शाखेकडून घेत अर्ज भरून १८ जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेत समक्ष हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment